By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 17:14 IST
1 / 8शहरातील गोंगाट, प्रदूषण आणि वाढत्या उष्म्यापासून सुटका करून घेण्यासाठी एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल, तर तमिळनाडू राज्यासारखा दुसरा उत्तम पर्याय नाही. निळाशार समुद्रकिनारा लाभलेल्या या राज्यात पश्चिम आणि पूर्व घाटातील निसर्गरम्य पर्वत रांगांमध्ये अशी काही हिल स्टेशन्स दडलेली आहेत, जिथे गेल्यावर तुम्हाला स्वर्गाचा अनुभव येईल. धुक्याची चादर, चहाचे मळे आणि अल्हाददायक हवामान असलेल्या ७ ठिकाणांबद्दल आज आपण जाणून घेऊया.2 / 8घनदाट जंगले आणि चहाच्या मळ्यांनी वेढलेले वालपराई हे वन्यजीव प्रेमींसाठी खास आहे. जर तुम्हाला निसर्गाचे मूळ आणि न बदललेले रूप पाहायचे असेल, तर येथे एकदा नक्की भेट द्या.3 / 8साहसी पर्यटनाची आवड असणाऱ्यांसाठी येलगिरी हे एक उत्तम ठिकाण आहे. येथील डोंगररांगांमधील ट्रेकिंग पाथ आणि गावातील शांत वातावरण तुम्हाला रोजच्या धकाधकीच्या जीवनापासून दूर घेऊन जाईल.4 / 8निलगिरी पर्वत रांगेतील सर्वात जुन्या हिल स्टेशन्सपैकी एक म्हणजे कोटागिरी. येथील न विखुरलेले निसर्गसौंदर्य, आल्हाददायक हवामान आणि ट्रेकिंगच्या वाटा पर्यटकांना आकर्षित करतात.5 / 8शेवरॉय हिल्समध्ये वसलेले येरकाड हे त्याच्या शांत वातावरणासाठी आणि संत्र्यांच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. येथे इतर ठिकाणांच्या तुलनेत गर्दी कमी असल्याने तुम्ही निवांतपणे सुट्ट्यांचा आनंद घेऊ शकता.6 / 8जर तुम्हाला उटीमधील गर्दी नको असेल, तर कुन्नूर हा सर्वोत्तम पर्याय आहे. येथील चहाच्या बागांमधून फिरणे आणि 'डॉल्फिन नोज'सारख्या व्ह्यू पॉइंटवरून दिसणारे निसर्गदृश्य डोळ्यांचे पारणे फेडते.7 / 8धुक्याने वेढलेले डोंगर आणि ताऱ्याच्या आकाराचा तलाव हे कोडाईकनालचे मुख्य आकर्षण आहे. शांतता शोधणाऱ्यांसाठी आणि हनिमून कपल्ससाठी हे एक आदर्श ठिकाण मानले जाते.8 / 8'क्वीन ऑफ हिल्स' म्हणून ओळखले जाणारे उटी हे पर्यटकांचे सर्वात लाडके ठिकाण आहे. येथील विस्तीर्ण चहाचे मळे, शांत तलाव आणि ब्रिटीशकालीन वास्तू पर्यटकांना भुरळ घालतात. येथील टॉय ट्रेनचा प्रवास हा आयुष्यातील एक अविस्मरणीय अनुभव ठरतो.