1 / 7मुंबईसारख्या महानगरांची तहान भागवणारी अनेक धरणं आहेत. (सर्व छायाचित्रं - विशाल हळदे)2 / 7शहापूर तालुक्यातील भातसा धरणातूनही अशाच प्रकारे मुंबईकरांना पाणीपुरवठा होतो. 3 / 7याच धरणाशेजारी असणाऱ्या डोंगरमाथ्यावरील पाड्यांवर राहणा-यांना मात्र घोटभर पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे. 4 / 7धरण शेजारी असूनही इथल्या लोकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. 5 / 7मे महिन्याच्या रखरखत्या उन्हातान्हात या गावांमध्ये येणा-या टँकरचे पाणी मिळवण्यासाठी महिलांसह चिल्ल्यापिल्ल्यांचीही गर्दी होते.6 / 7घसा कोरडा पडलेल्या विहिरींतील पाषाणात एखादा पाझर फुटेल, या आशेने खोदकाम सुरूच असते. 7 / 7एखाद्या विहिरीत ओंजळभर पाणी दिसले तरी विहिरीत उतरण्याची कसरत दिसते.