Sundara ManaMadhye Bharali Update: जहागीरदारांच्या घरी लवकरच होणार लतिकाचा गृहप्रवेश; लग्नसोहळ्याचे फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 01:23 PM2021-11-30T13:23:19+5:302021-11-30T13:30:21+5:30

Sundara ManaMadhye Bharali: गेल्या काही दिवसांमध्ये या मालिकेत अनेक नवनवीन वळणं आल्याचं पाहायला मिळालं. यात खासकरुन अभि आणि लतिकाच्या संसारात अनेक चढउतार आले.

छोट्या पडद्यावरील तुफान गाजलेली मालिका म्हणजे सुंदरा मनामध्ये भरली.

अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या मालिकेने आज प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे या मालिकेविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

गेल्या काही दिवसांमध्ये या मालिकेत अनेक नवनवीन वळणं आल्याचं पाहायला मिळालं. यात खासकरुन अभि आणि लतिकाच्या संसारात अनेक चढउतार आले.

एकेकाळी एकमेकांचा सहवास नको असलेले हे दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. त्यामुळे ही मालिका सध्या रंजकदार वळणावर पोहोचली आहे.

लवकरच अभिमन्यु आणि लतिका पुन्हा लग्नगाठ बांधणार आहेत. त्यामुळे जहागीरदारांच्या घरी लग्नाची लगबग सुरु झाली आहे.

सध्या सोशल मीडियावर अभि आणि लतिकाच्या लग्नाचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये दोघंही वधूवरांच्या वेशात दिसून येत आहेत.

सध्या सोशल मीडियावर अभिमन्यु आणि लतिकाच्या लग्नाच्या फोटोंची तुफान चर्चा आहे.

या फोटोमध्ये लतिकाचा मस्तीखोर स्वभाव दिसून येत आहे. हे दोन्ही कलाकार बॅक स्टेजवर मज्जा-मस्ती करताना दिसत आहेत.