सिल्कची साडी अन् मराठमोळा साज; सायली कांबळेच्या महाराष्ट्रीयन लूकची होतीये चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 08:00 AM2022-05-27T08:00:00+5:302022-05-27T08:00:07+5:30

Sayali kamble: सायलीने अलिकडचे प्रियकर धवलसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर ती सातत्याने तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत येत आहे.

सायली कांबळे हे नाव सध्या कोणत्याही प्रेक्षक, श्रोत्यासाठी नवीन राहिलेलं नाही. ‘इंडियन आयडल 12’ची सेकंड रनर अप ठरलेली सायली सोशल मीडियावर कायम चर्चेत येत असते.

गोड आवाजामुळे चर्चेत येणारी सायली गेल्या काही काळापासून तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत आहे.

सायलीने अलिकडचे प्रियकर धवलसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर ती सातत्याने तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत येत आहे.

लग्नानंतर सायलीने अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत तिच्या वैवाहिक जीवनाचे अपडेट्स चाहत्यांना दिले आहेत. यामध्ये अलिकडेच तिने सिल्कच्या साडीमधील काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये सायली महाराष्ट्रीयन लूकमध्ये दिसत असून तिने छान साजशृंगार केला आहे.

सायलीने तिच्या लग्नातील अनेक फोटो शेअर केले आहेत. या धवलसोबतच्या तिच्या फोटोंना विशेष लोकप्रियता मिळाली.

सायली या फोटोमध्ये कमालीची सुंदर दिसत असून त्यावर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.

सायलीने तिच्या कुटुंबासोबतही फोटो शेअर केला आहे.

आजच्या घडीला सायलीचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो.