'Bigg Boss Marathi' फेम स्नेहा वाघ आहे 'या' आजाराने त्रस्त; पोस्ट शेअर करत दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 05:36 PM2021-12-05T17:36:19+5:302021-12-05T17:47:46+5:30

Sneha wagh:प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे सर्वाधिक चर्चेत राहिलेली स्नेहा सध्या एका त्वचेसंबंधित आजाराने त्रस्त झाली आहे.

मराठीसह हिंदी मालिकांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे स्नेहा वाघ. अलिकडेच स्नेहा बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातून बाहेर पडली.

बिग बॉस मराठी ३ मध्ये सहभागी झालेली स्नेहा वाघ या घरात विविध कारणांमुळे चर्चेत राहिली.

प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे सर्वाधिक चर्चेत राहिलेली स्नेहा सध्या एका त्वचेसंबंधित आजाराने त्रस्त झाली आहे.

स्नेहाने अलिकडेच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने तिच्या स्किनशी संबंधित आजाराविषयी माहिती दिली.

स्नेहाच्या चेहऱ्यावर लहानशी दुखापत झाली असून त्यामुळे तिला फेशिअल हेमाटोमा झाल्याचं तिने सांगितलं आहे.

तसंच 'काळजी करु नका.. मी लवकरच बरी होईन', असंही आवाहन तिने चाहत्यांना केलं आहे.

स्नेहा सोशल मीडियावर सक्रीय असून ती कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

स्नेहा वाघ छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. विशेष म्हणजे बिग बॉस मराठी ३ या शोमुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली.