अभिज्ञा भावेने शेअर केला बॉयफ्रेंडसोबतचा फोटो, दिसली रोमँटिक अंदाजात,See Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 07:00 AM2020-09-24T07:00:00+5:302020-09-24T07:00:00+5:30

पहिल्या लग्नातून विभक्त झाल्यानंतर अभिज्ञा भावे पडली या व्यक्तीच्या प्रेमात

तुला पाहते रे मालिकेतील मायराच्या भूमिकेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री अभिज्ञा भावे सोशल मीडियावर सक्रीय आहे.

नुकतेच अभिज्ञाने बॉयफ्रेंडसोबत फोटो शेअर केला आहे.

यापूर्वी तिने सोशल मीडियावर मेहूल पैच्या प्रेमात असून त्याच्यासोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत तिने हार्ट असं कॅप्शन दिले होते.

मेहुल पै मुळचा मुंबईचा असून गेल्या १२ वर्षांपासून 'क्लॉकवर्क्स इव्हेंटस प्रायव्हेट लिमिटेड'मध्ये तो ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहे.

यातून इव्हेंट मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट, फायनान्शियल प्लॅनिंगची जबाबदारी तो सांभाळतो आहे.

फार कमी लोकांना माहित आहे की चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अभिज्ञा एअरहॉस्टेस होती.

२०१० साली 'प्यार की ये एक कहाणी' या हिंदी मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.

२०१४ साली ती वरूण वैटिकर यांच्यासोबत विवाहबद्ध झाली होती. मात्र काही कारणास्तव नंतर ती विभक्त झाली.

अभिज्ञाच्या मुव्हिंग आऊट या वेबसीरिजला देखील खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर नुकताच त्याचा दुसरा सीझनदेखील प्रदर्शित करण्यात आला.

अभिज्ञा सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.