आमना शरीफच्या मुलाचे फोटो पाहिलेत का? दिसतो प्रचंड क्यूट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 07:00 AM2020-04-27T07:00:00+5:302020-04-27T07:00:02+5:30

लॉकडाऊनमध्ये सगळेच कलाकार सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असून आपले विविध फोटो, व्हिडिओ पोस्ट करत आहेत.

आमना शरीफने तिच्या मुलाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले असून हे फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत.

आमनाचा मुलगा खूपच क्यूट असल्याचे तिचे फॅन्स तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.

आमना शरीफला कही तो होगा या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. तिने आफताब शिवदासानी सोबत आलू चाट या चित्रपटात देखील काम केले होते.

आमना सध्या कसौटी जिंदगी की २ या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे.

आमना तिच्या इन्स्टाग्रामवर नेहमीच तिचे स्टायलिश अंदाजातील फोटो पोस्ट करत असते.

कसौटी जिंदगी की या मालिकेत हिना खान कोमालिकाची भूमिका साकारत होती. पण आता तिची जागा आमनाने घेतली असून तिची भूमिका तिच्या चाहत्यांना आवडत आहे.

आमना लग्न झाल्यानंतर अनेक वर्षं अभिनयक्षेत्रापासून दूर होती. तिने कसौटी जिंदगी की २ या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर कमबॅक केला.