Jio की BSNL; 100 रुपयांमध्ये कोणाकडे उत्कृष्ट रिचार्ज प्लॅन? तुमचा फायदा कुठेय? पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 18:20 IST
1 / 7 BSNL And Jio 100 Rupees Recharge Plan: Jio आणि BSNL च्या स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये कोणता चांगला आहे? कोणत्या कंपनीचा प्लॅन अधिक डेटा आणि इतर सुविधा देतो? पाहा...2 / 7 जिओकडे 100 रुपयांचा रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहे, तर बीएसएनएलकडे 107 रुपयांचा उपलब्ध आहे. Jio च्या 100 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना एक खास ऑफर दिली जात आहे. या प्लॅनमध्ये युजरला Jio Hotstar चे सबस्क्रिप्शन मिळते. 3 / 7 Jio च्या या 100 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची वैधता 90 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 5 GB डेटा मिळतो. यासोबतच तुम्हाला या प्लॅनमध्ये पूर्ण तीन महिन्यांसाठी Jio Hotstar सबस्क्रिप्शन देखील मिळते. 4 / 7 या प्लॅनचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांनी हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, त्यांना मासिक प्लॅन संपल्याच्या 48 तासांच्या आत बेस प्लॅन रिचार्ज करणे आवश्यक आहे, जेणेकरून ते दुसऱ्या आणि तिसऱ्या महिन्यातदेखील Jio Hotstar सबस्क्रिप्शनचे फायदे घेऊ शकतील.5 / 7 BSNL चा 107 रुपयांचा रिचार्ज प्लॅन हा सर्वात जास्त वापरला जाणारा प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये युजरला 3 GB फ्री डेटा मिळतो. यासोबतच 200 मिनिटे मोफत लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल करण्याची सुविधा उपलब्ध आहे. बीएसएनएलच्या या प्लॅनची वैधता 107 दिवसांची आहे.6 / 7 BSNL च्या प्लॅनमध्ये कोणत्याही स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन उपलब्ध नाही. पण, बीएसएनएलच्या प्लॅनमध्ये 3 जीबी डेटा 107 रुपयांमध्ये उपलब्ध आहे, तर जिओच्या 100 रुपयांच्या प्लॅनमध्ये 5 जीबी डेटा उपलब्ध आहे.7 / 7 यानुसार जिओचा प्लान अधिक चांगला आहे. परंतु BSNL प्लॅनमध्ये तुम्हाला 200 मिनिटे मोफत कॉलिंगची सुविधादेखील मिळते, जी Jio रिचार्ज प्लॅनमध्ये उपलब्ध नाही. आता तुम्ही आपल्या गरजेनुसार प्लॅन निवडू शकता.