By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 14:29 IST
1 / 6Reliance Jio आणि Airtel प्रमाणे सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL देखील आपल्या ग्राहकांना उत्तमोत्तम ऑफर देत राहते. तुम्हालाही घरी हाय-स्पीड ब्रॉडबँड कनेक्शन मिळवायचे असेल, तर BSNL ने अलीकडेच एक नवीन ऑफर आणली आहे, ज्या अंतर्गत कंपनी 1 GBPS स्पीड असलेल्या या प्लॅनवर 6000 रुपयांपर्यंतचा बंपर डिस्काउंट देत आहे. हा प्लॅन ऑफिस किंवा पीजीमध्ये राहणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे.2 / 6BSNL च्या फायबर रुबी ओटीटी प्लॅनवर 6000 रुपयांची सूट मिळत आहे. नियमित इंटरनेट वापरकर्त्यांना हा प्लॅन महाग वाटू शकतो, परंतु हा प्लॅन ऑफिस आणि पीजीसाठी परिपूर्ण आहे. 3 / 6टेलिकॉम टॉकच्या अहवालानुसार, पहिल्या ६ महिन्यांसाठी या प्लॅनमध्ये ग्राहकांना दरमहा 1000 रुपयांची सूट मिळेल. याचा अर्थ, पहिल्या 6 महिन्यांसाठी तुम्हाला हा प्लॅन 4799 नाही, तर 3799 रुपयांमध्ये मिळेल.4 / 61 जीबी प्रति सेकंद स्पीड देणाऱ्या या प्लॅनसह तुम्हाला कंपनीकडून दरमहा 9500 जीबी हाय स्पीड इंटरनेट दिले जाईल. याशिवाय, या प्लॅनमध्ये काही प्रीमियम ओटीटी प्लॅटफॉर्मचा फायदा देखील मिळतो. 1 जीबीपीएस स्पीडसह बीएसएनएल प्लॅनमध्ये डिस्ने + हॉटस्टार, सोनीलिव्ह प्रीमियम, लायन्सगेट, झी5 प्रीमियम, शेमारु आणि इतर ओटीटी अॅप्स मिळतात.5 / 6महत्वाची बाब म्हणजे, बीएसएनएलची ऑफर मर्यादित काळासाठी आहे. तुम्ही १५ ऑगस्ट २०२५ पासून १३ सप्टेंबर २०२५ पर्यंत ही ऑफर घेऊ शकता. या ऑफरचा फायदा फक्त निवडक बीएसएनएल सर्कलमध्ये उपलब्ध आहे. 6 / 6तुम्हालाही ही ऑफर आवडली असेल, तर तुम्ही बीएसएनएल कस्टमर केअर किंवा जवळच्या बीएसएनएल ऑफिसला भेट देऊन ऑफरशी संबंधित अधिक माहिती मिळवू शकता.