सावधान! तुमच्या Android Phone च्या सुरक्षेसाठी हे 5 सिक्योरिटी चेक्स आहेत अत्यंत महत्वाचे; त्वरित जाणून घ्या
By सिद्धेश जाधव | Updated: January 27, 2022 20:09 IST
1 / 6तुम्ही तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोनची सुरक्षा मोफत तपासू शकता. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोरवरून F-Secure AV Test अॅप इन्स्टॉल करावं लागेल. हा एक निरुपद्रवी व्हायरस आहे, जर तुमची सुरक्षा चांगली असेल तर ती लगेच याला डिटेक्ट करेल. म्हणजे तुम्हाला तुमच्या अँटी व्हायरसची तसेच गुगल प्ले प्रोटेक्ट सुरक्षा चांगली आहे कि नाही ते समजेल. 2 / 6SAFE Me अॅप तुमच्या स्मार्टफोनची सेटिंग्स चेक करतो आणि त्यातील धोकादायक सेटिंग्स बदलण्यास मदत करतो. 3 / 6App Permission Dashboard अॅप तुम्ही इन्स्टॉल केलेल्या अॅप्सनी कोणत्या परवानग्या घेतल्या आहेत. तसेच त्यातील धोकादायक परवानग्या या अॅपमध्ये हायलाईट होतात. इथून तुम्ही त्या रद्द देखील करू शकता किंवा अॅप अनइन्स्टॉल देखील करू शकता. 4 / 6Jumbo अॅपच्या मदतीने तुम्ही गुगल, फेसबुक, अॅमेझॉन, युट्युब आणि ट्विटरवरील देखील सिक्योरिटीतील दोष शोधू शकता. तसेच फक्त ई-मेल अॅड्रेस देऊन तुमचा डेटा कुठे लीक झाला आहे कि नाही ते बघू शकता. 5 / 6तुम्ही तुमच्या अँड्रॉइड सेटिंगमध्ये जाऊनच बॅकग्राऊंडमध्ये सुरु असलेले अॅप्स आणि सर्व्हिसेस बघू शकता. तसेच त्यातील संशयास्पद सर्व्हिसेस किल करू शकता. 6 / 6साधारणतः डिफॉल्ट अँड्रॉइड सिक्योरिटीवर विश्वास ठेवता येतो. परंतु कधी कधी सुरक्षेची अजून एक लेयर असणं आवश्यक असतं.