शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बापरे! उन्हात फिरायला काय गेली, अख्खा चेहरा सुजला; रुग्णालय गाठताच समोर आलं असं काही....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 18:16 IST

1 / 7
ब्रिटनमधील एका तरूणीला उन्हात जाण्याची मोठी किंमत मोजावी लागली आहे. साऊथ वेल्सची रहिवासी असलेली २६ वर्षीय लॉरेन स्टेसी या तरूणीला आपल्यासोबत असं काही होईल याची कल्पनाही नव्हती. फक्त एक दिवस घराबाहेर गेल्यानं त्वचेवर ऊन पडून तिचा चेहरा चांगलाच खराब झाला.
2 / 7
एनएचएस वर्कर लॉरेननं द सन वेबसाईटशी बोलताना सांगितले की, ''जेव्हा मी सुट्टीवर होते तेव्हा संपूर्ण तोंडाला सनस्क्रिन क्रिम लावली होती. पण त्या दिवशी मी चेहरा आणि संपूर्ण कपाळावर क्रिम लावायला विसरले. त्यामुळे माझ्या त्वचेची अवस्था अशी झाली. ''
3 / 7
तिनं पुढे सांगितले की, ''उन्हातून जाऊन आल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा मी झोपेतून उठली तेव्हा माझा पूर्ण चेहरा सुजला होता. डोळे उघण्याचा मी खूप प्रयत्न केला पण काही केल्या डोळे उघडू शकत नव्हती. थोडेसे डोळे उघडले तेव्हा मी माझ्या रूममेटला मी कशी दिसतेय? चेहरा नॉर्मल आहे का? असं विचारलं. ''
4 / 7
त्यावेळी तिची मैत्रिण तिला पाहून खूप घाबरली. ती म्हणाली की, मी स्वतः माझा चेहरा आरश्यात नीट पाहायला हवा. खूप वेळानं मी आरसा पाहिला तेव्हा दिसलं की, माझे डोळे सुजल्यामुळे मी व्यवस्थित पाहू शकत नव्हते. अक्षरक्षः एखाद्या राक्षसाप्रमाणे माझा चेहरा दिसत होता.
5 / 7
असा चेहरा घेऊन कुठेही फिरणं शक्यत नव्हतं म्हणून तिनं लगेचच रुग्णालय गाठलं. डॉक्टरांनी सांगितले की, ''सुर्याच्या किरणांमुळे तिला एलर्जीक रिएक्शन झाली आहे. त्वचा अति संवेदनशील असल्यामुळे सुर्याच्या किरणांशी संपर्क आल्यानं त्वचेवर उष्णता दिसायला सुरूवात झाली.''
6 / 7
डॉक्टरांनी पुढे सांगितले की, ''लॉरेनला सन पॉईजनिंग झालं असावं. उन्हात गेल्यानंतर त्वचेवर उद्भवणारी सगळ्यात तीव्र स्टेज म्हणजे सन पॉईजनिंग. त्यामुळे त्वचेवर सूज येते, श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. या आजारापासून बचावासाठी सनस्क्रिन लावण्याचा आणि जास्त उन्हात बाहेर न जाण्याचा सल्ला दिला जातो.''
7 / 7
सूज कमी होण्यासाठी डॉक्टरांनी लॉरेनला एंटीहिस्टेमिन्स वापरण्याचा सल्ला दिला आहे. सुजलेला चेहरा घेऊन जेव्हा ही तरूणी एअरपोर्टवर पोहोचली तेव्हा डिजिटल फेस सॉफ्टवेअरनं तिचा चेहरा ओळखण्यास नकार दिला. त्यानंतर एअरपोर्ट स्टाफनं तिला साहाय्य करून प्रवासासाठी परवानगी मिळवून दिली. औषधाच्या वापरानंतर ५ दिवसांनी ही सूज कमी झाली.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेBeauty Tipsब्यूटी टिप्सViral Photosव्हायरल फोटोज्