शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

संक्रांतीच्या हळदी कुंकासाठी खास लूक हवाय? पाहा मराठी अभिनेत्रींचे संक्रात स्पेशल देखणे फोटो, ठरवा तुमचा लूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2022 18:15 IST

1 / 7
१. काळी प्लेन साडी आणि लाल रंगाचं ब्लाऊज... हा स्पृहा जोशीचा संक्रांत स्पेशल लूक अतिशय कुल आहे... साडीसोबत तिने जे दागिने घातले आहेत, त्यामुळे तिचा लूक खूप उठून दिसत आहे. असे दागिने जर मिळाले तर स्पृहासारखा लूक कॅरी करायला हरकत नाही..
2 / 7
२. मिताली मयेकरचा हा लूक खूपच खास आहे.. मॉडर्न आणि ट्रॅडिशनल असं सुरेख कॉम्बिनेशन तिच्या या लूकमध्ये दिसून येतं. काळ्या- निळ्या रंगाची साडी.. आणि त्यावर ऑक्सिडाईज ज्वेलरी, परफेक्ट लूक..
3 / 7
३. काठपदाराची काळी साडी, मोठी टिकली, केसांचा अंबाडा आणि त्यावर माळलेला गजरा.. हा मंजिरी ओकचा लूक तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आहे..
4 / 7
४. मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडे हिची लग्नानंतरची ही पहिली संक्रांत. त्यामुळे तिने ती अगदी टिपिकल पद्धतीने हलव्याचे दागिने घालून साजरी केली. काळी साडी आणि हलव्याचे दागिने यात अंकिता खरोखरंच गोड दिसत होती.
5 / 7
५. सुकन्या मोनेही संक्रांतीला खूप छान पद्धतीने तयार झाल्या होत्या. त्यांचे दागिने सिल्वर आणि गोल्डन या दोन्ही रंगांचे आहेत. त्यामुळे साडीचे काठ आणि डिझाईन दोन्ही गोल्डन रंगाचे असूनही ती ज्वेलरी त्यावर खुलून दिसत आहे.
6 / 7
६. काळ्या रंगाची साडी, गुलाबी काठ, मोठी टिकली आणि त्यावर साधे- सिंपल पण क्यूट दागिने असा मंजिरी भावे यांचा लूकही खास ठरला आहे.
7 / 7
७. सावनी रविंद्र यांचा संक्रात लूकही अतिशय उत्तम जमून आला आहे. काळी पैठणी, नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर अशा पद्धतीने तयार झालेली सावनी नेटकरींना भलतीच आवडली आहे.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलCelebrityसेलिब्रिटीMakar Sankrantiमकर संक्रांतीfashionफॅशन