शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

बागेत छानसा वेल चढवायचा? बघा ५ प्रकारचे वेल- दिसायला मोहक आणि वाढतील भराभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2024 17:05 IST

1 / 7
अंगणातल्या एका काेपऱ्यात चढविण्यासाठी, टेरेस गार्डनचा काही भाग डेकोरेट करण्यासाठी किंवा घराच्या गेटच्या कमानीवर चढविण्यासाठी अनेक जणांना एखादा वेल लावायचा असतो. पण कोणता वेल लावावा, ते कळत नाही.
2 / 7
म्हणूनच त्यासाठी बघा वेलींचे हे काही खास प्रकार. तुमच्या बागेच्या आकारानुसार किंवा तुम्हाला तो वेल किती उंचीवर चढवायचा आहे, त्यानुसार यापैकी कोणता वेल निवडायचा ते ठरवा...
3 / 7
आपल्याकडे बहुसंख्य घरांमध्ये घराच्या गेटच्या कमानीवर चढवला जाणारा वेल म्हणजे मधुमालती. उन्हाळ्याच्या दिवसांत या वेलीला खूप छान सुगंधी फुलं येतात. ही फुलं सुरुवातीला गुलाबी नंतर पांढरी होतात. त्यामुळे त्यांचा सुगंध अंगणात- घरात दरवळत राहतो.
4 / 7
ट्रम्पेट वाईन trumpet vine हा वेलही खूप छान वाटतो. त्याला सुरुवातीला छान पिवळ्या रंगाची फुलं येतात आणि नंतर ते नारंगी रंगाची होतात. या वेलीच्या वाढीसाठी खूप काळजी घेण्याचीही गरज नाही. या वेलीला संक्रांत वेल असंही म्हणतात.
5 / 7
गोकर्णाचा वेलही खूप भराभर वाढतो. या वेलीची विशेष काळजी घ्यावी लागत नाही. त्याचं बी मातीत पडलं की आपोआप त्याला पालवी फुटत जाते. त्याला पांढऱ्या आणि निळ्या रंगाची फुलं येतात. जो रंग आवडेल त्या फुलांचा वेल लावू शकता.
6 / 7
तुमच्याकडे खूप मोठी जागा असेल तर तुम्ही बाेगन वेल लावण्याचाही विचार करू शकता. हा वेलही भराभर वाढतो. शिवाय त्याच्याकडे कमीतकमी लक्ष दिलं तरी चालतं. गुलाबी, नारंगी, पांढरा अशा अनेक रंगांमध्ये बोगन वेल मिळतो. भरपूर ऊन येईल, अशा ठिकाणी हा वेल लावावा.
7 / 7
उंच जागेवरून खाली सोडून भिंतीला डेकोरेशन करायचं असेल तर पर्पल हर्ट हा वेल तुम्ही लावू शकता. या वेलीला फिकट गुलाबी रंगाची छान फुलं येतात. उन्हाळ्यात हा वेल विशेष वाढतो. कुंडीतही हा वेल लावू शकता.
टॅग्स :Gardening Tipsबागकाम टिप्सTerrace Gardenगच्चीतली बाग