शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

साध्या साडीत 'रॉयल लूक'! तमन्ना भाटियाचे ५ ब्लाऊज डिझाइन्स, कर्वी फिगर- दिसाल सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2026 19:00 IST

1 / 7
लग्नसराई म्हटलं की आपल्याला साडीसोबत परफेक्ट ब्लाऊज हवा असतो. योग्य डिझाइनचा ब्लाऊज निवडला तर साधी साडीही एखाद्या डिझाइनरसारखी दिसू लागते. कर्वी फिगर असणाऱ्या महिलांसाठी योग्य फिटिंगचे आणि डिझाइनचे ब्लाऊज निवडणं थोडे कठीण जाते. अशा वेळी 'मिल्की ब्युटी' तमन्ना भाटियाची ब्लाउज फॅशन तुमच्यासाठी गेम-चेंजर ठरू शकते. (Tamannaah Bhatia blouse designs)
2 / 7
तमन्ना भाटिया तिच्या बोल्ड आणि क्लासी लूकसाठी ओळखली जाते. तिचे ब्लाऊज डिझाइन्स केवळ स्टायलिश नसतात तर ते शरीराच्या कर्व्सना योग्य पद्धतीने हायलाईट करतात. पाहूयात कर्वी फिगर असणाऱ्यासाठी ५ ब्लाऊजच्या डिझाइन्स (saree blouse ideas)
3 / 7
तमन्ना भाटिया अनेकादा प्लंजिंग नेकलाइन असणारे ब्लाऊज घालते. कर्वी फिगर असलेल्या महिलांसाठी हे डिझाइन्स अतिशय छान दिसते. यात आपली मान लांब दिसते. शरीराचा वरचा भाग अधिक उठून दिसतो.
4 / 7
एल्बो लेन्थ स्लीव्हज हे आपल्या हातांचा जाडपणा लपवत नाही तर आपल्या संपूर्ण लूकला रॉयल टच देतात. सिल्क किंवा ब्रोकेडच्या साडीवर अशा प्रकारचे ब्लाऊज शोभून दिसते.
5 / 7
नॅरो शोल्डर आणि ब्रॉड नेक हे कर्वी महिलांसाठी वरदान आहे. यामुळे आपले खांदे जास्त रुंद दिसत नाहीत आणि आपले लक्ष चेहऱ्याकडे व गळ्यातील दागिन्यांकडे असते. स्वीटहार्ट नेक हा यातील सगळ्यात सुंदर प्रकार आहे.
6 / 7
कॉर्सेट स्टाईल ब्लाउज सध्या ट्रेंडमध्ये आहे. हे ब्लाऊज कमरेच्या भागाला विशिष्ट आकार देते ज्यामुळे आपली फिगर अधिक चांगली दिसते.
7 / 7
हेवी एम्ब्रॉयडरी आणि न्यूड शेड्स असणारे ब्लाऊज हलक्या रंगाच्या साड्यांवर चांगले दिसतात. आपली साडी प्लेन असेल तर त्यावर बोल्ड वर्क असलेला ब्लाऊज निवडा. यात योग्य मापाचा ब्लाऊज निवडा.
टॅग्स :fashionफॅशनWomenमहिला