शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

शोभिताने विवाहपूर्व सोहळ्यात घातलेल्या अस्सल पारंपरिक दागिन्यांची होतेय चर्चा, कारण आहे खास...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2024 19:24 IST

1 / 7
दक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य व शोभिता धुलिपाला (Sobhita Dhulipala) यांच्या लग्नाच्या (Sobhita Dhulipala Naga Chaitanya Wedding) चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु होत्या. अखेर ते दोघेही विवाह बंधनात अडकले आहेत. कुटुंबिय आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत पारंपरिक थाटात दोघांनी लग्नगाठ बांधली. विवाहसोहळा हैदराबाद येथील अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये थाटामाटात पार पडला. या विवाह सोहळ्यापूर्वी तेलगू लग्न परंपरेनुसार एक 'पेली राता' नावाचा विधी केला जातो. या विधी दरम्यान शोभिताने परिधान केलेल्या दागिन्यांची इतकी चर्चा का होतेय ते पाहूयात.
2 / 7
१. बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेला अभिनेत्री शोभिता धुलीपाला आणि अभिनेता नागा चैतन्य यांचा विवाहसोहळा अखेर काल पार पडला. त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले असून केसांपासून ते पायपर्यंत नखशिखांत सजलेली शोभिता अतिशय सुंदर दिसत होती.
3 / 7
२. दोघांच्याही लग्नाच्या विधीचे फोटो सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. दोघांच्याही फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव केलाय.
4 / 7
३. तेलगू लग्न परंपरेमध्ये विवाहपूर्व एक खास 'पेली राता' नावाचा विधी केला जातो. हा विधी विवाहापूर्वी वधूला शुद्ध करतो आणि आशीर्वाद देतो असे मानले जाते.
5 / 7
४. शोभिताने सोनेरी रंगाच्या कांजीवरम साडीवर शोभून दिसतील असे तिच्या आई आणि आजीचे पारंपारिक दागिने घातले होते. या पारंपरिक दागिन्यांत नववधूच रुपं अधिकच खुलून येत होत. याचबरोबर, अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी त्यांच्या लग्नात आई आणि आजीचे दागिने घालण्याचा हटके आणि नवा ट्रेंड शोभितानेही फॉलो केल्याचे दिसून येत आहे.
6 / 7
५. शोभिताने तिच्या विवाहपूर्व 'पेली राता' या विधीदरम्यान तिच्या आई आणि आजीचे पारंपरिक दागिने घातल्याने तिच्यासाठी हा क्षण आणखी खास झाला.
7 / 7
६. शोभिताने गळ्याबरोबर चोकर, त्यानंतर अनेक पदरी लेयर्ड लांब नेकलेस आणि पारंपारिक डिजाईन्सच्या सोन्याच्या बांगड्या असा साजशृंगार केला होता. यासोबतच तिने नाकात घातलेल्या पारंपरिक नथीमुळे तिचा लूक अधिकच खुलून येत होता. तिचा प्रत्येक दागिना भारतीय सांस्कृतिक परंपरेला साजेसा असाच होता. यासोबतच तिने कानांत अगदी नाजूक नक्षीकाम असणारे झुमके घातले होते.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलfashionफॅशन