1 / 9आजकाल बाजारात रंगीत किंवा सोनेरी दागिन्यांपेक्षा चंदेरी रंगाच्या दागिन्यांना जास्त डिमांड आहे. 2 / 9अशा दागिन्यांना ऑक्सिडाईज ज्वेलरी असे म्हटले जाते. तरुण मुली आणि मध्यम वयीन दोन्ही कॅटेगरीतील महिलांना ही ज्वेलरी फार आवडते. 3 / 9साध्या कॉटनच्या ड्रेसपासून, झगमगीत साडीपर्यंत सर्वच कपड्यांवर ती फार शोभून दिसते. फार साधी असूनही अशी ऑक्सिडाईज ज्वेलरी फारच आकर्षक दिसते. 4 / 9ऑक्सिडाईज कानातले तर आजकाल सगळेच वापरत आहेत. लहान टॉप्सपासून मोठ्या झुमक्यांपर्यंत सगळ्या प्रकारचे कानातले यात उपलब्ध आहेत. 5 / 9ऑक्सिडाईज नथ हे एक नवीन पिढीचं ऑप्सेशन आहे. छोटीशी साधी पण क्लासी दिसते. या नथीमध्ये ट्रेडिशनल व वेस्टर्न दोन्ही लुक आहेत. 6 / 9ऑक्सिडाईज बांगड्या किंवा कडं फारच वापरलं जातं. छान नक्षीदार सिंगल बांगडी बाजारात उपलब्ध आहे. कॉटनच्या साडीवर फार सुंदर दिसते. 7 / 9ऑक्सिडाईज नेकलेस या प्रकारात भरपूर व्हरायटी आहे. यात चोकर मिळतात. तसेच लांब मोठे नेकलेसही मिळतात. 8 / 9ऑक्सिडाईज ज्वेलरी टिकाऊ असते. पण धूळ, माती, वातावरणाचा त्यावर परिणाम होऊन त्याचा रंग जातो. 9 / 9काळी झालेली ज्वेलरी घरच्या घरी पुन्हा चमकता येते. एका भांड्याला फॉइल पेपर लावा. त्यात गरम पाणी घ्या. बेकींग सोडा टाका. थोडा डिशवॉश सोप टाका. त्यात ज्वेलरी तासभर ठेवा. नंतर ब्रशने घासा. मस्त स्वच्छ होते.