शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एक्सपायरी डेट उलटून गेलेले ब्यूटी प्रॉडक्ट्स वापरताय ? तारीख बघा, मेकअपच्या दुखण्यावर गाठावा लागेल डाॅक्टर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2025 15:14 IST

1 / 9
'मेकअप बॉक्स' हा महिलांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा ( Shelf Life of Common Cosmetic Products) विषय असतो. प्रत्येकीच्या बॅगमध्ये तिचा असा स्वतःचा असा एक छोटा मेकअप किट असतोच. परंतु या मेकअप किट मधील ब्यूटी प्रॉडक्ट्सची शेल्फ लाईफ नक्की किती आहे, याबद्दल बऱ्याचजणींना माहिती नसते.
2 / 9
एकदा का आपण हे ब्यूटी प्रॉडक्ट्स विकत घेतले (Shelf Life and Expiration Dating of Cosmetics) की वर्षानुवर्षे आपण तेच ब्यूटी प्रॉडक्ट्स वापरतो, आपण त्या ब्यूटी प्रॉडक्ट्सची एक्स्पायरी डेट देखील पाहत नाही.
3 / 9
खरंतर, मेकअप किटमधील प्रत्येक ब्यूटी प्रॉडक्ट्सची एक्स्पायरी डेट (How Long Will My Makeup Products Last Expiry Times & Dates Explained) असते तसेच ते कधी पर्यंत वापरायचे याची देखील शेल्फ लाईफ असते. यासाठी मेकअप किटमधील कोणते ब्यूटी प्रॉडक्ट्स किती वर्ष वापरावेत ते पाहा...
4 / 9
खरंतर, प्रत्येक कंपनी त्यांच्या ब्यूटी प्रॉडक्ट्सची वेगवेगळी शेल्फ लाइफ ठरवते. लिक्विड फाउंडेशन साधारणपणे १८ महिने चांगले टिकू शकते, तर पावडर फाउंडेशनचे शेल्फ लाइफ दोन वर्षांपर्यंतच असते. जर त्याचा वास बदलू लागला तर समजून जा की ते आता खराब होणार आहे.
5 / 9
लिपस्टिक कोणत्याही कंपनीची असली तरी, तिचे शेल्फ लाइफ जास्तीत जास्त दोन वर्षे असते. जेव्हा एखादी लिपस्टिक खराब होऊ लागते तेव्हा तिचा रंग बदलू लागतो आणि त्यावर पांढरा थर जमा होऊ लागतो. इतकेच नव्हे तर त्यातून दुर्गंधी येऊ लागते. अशा परिस्थितीत चुकूनही अशा लिपस्टिकचा वापर करु नका, यामुळे तुमच्या ओठांना त्रास होऊ शकतो.
6 / 9
आय मेकअप ब्यूटी प्रॉडक्ट्स वापरण्यापूर्वी, त्याची शेल्फ लाइफ नक्कीच तपासा कारण त्यामुळे दृष्टी कमी होऊ शकते. शक्यतो, चांगल्या ब्रँडेड दर्जाच्या मस्कराचे शेल्फ लाइफ फक्त ६ ते ८ महिने असते. बराच वेळ उघडा ठेवल्यानंतर मस्कारा सुकू लागतो, ज्यामुळे त्यात बॅक्टेरिया वाढतात, ज्यामुळे ऍलर्जी होऊ शकते.
7 / 9
मस्कराप्रमाणे, आयलाइनरचे शेल्फ लाइफ देखील ३ ते ८ महिने असते. त्यापेक्षा जास्त काळ वापरल्याने तुमच्या डोळ्यांना इजा होऊ शकते. लिक्विड आयलायनर ३ ते ८ महिने टिकू शकते. पेन्सिल आयलाइनर २ वर्षे चांगले राहते, तर जेल आयलाइनर फक्त ९ महिनेच वापरता येते.
8 / 9
मेकअप किटमधील फेस पावडर १ ते २ वर्ष चांगली टिकून राहते. त्यानंतर या पावडरचे खडे होऊ लागले किंवा त्याचा सुगंध कमी होऊन वेगळाच कुबट वास येऊ लागला तर पावडर खराब झाली आहे असे समजावे.
9 / 9
सध्या गालांवर हलका गुलाबी ग्लो येण्यासाठी रोझ पिंक किंवा लाल रंगाचा ब्लश लावण्याचा ट्रेंड आहे. हा ब्लश पावडर प्रमाणेच १ ते २ वर्ष चांगला टिकून राहतो.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सMakeup Tipsमेकअप टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजी