शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

प्लेन साडी - डिझायनर ब्लाऊजची सुपरहिट जोडी! फॅशनचा नवा ट्रेंड - दिवाळीत लूक दिसेल हटके...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2025 17:52 IST

1 / 10
दिवाळी हा प्रकाशाचा आणि आनंदाचा सण आहे. या खास दिवशी पारंपरिक आणि स्टायलिश लूक करण्याची आपली इच्छा असते. साडी हा असाच एक पारंपरिक पोशाख आहे, जो (how to style plain saree with designer blouse) प्रत्येक स्त्रीचे सौंदर्य अधिक खुलवतो. मात्र, अनेकदा साडीची निवड कशी करावी आणि त्यावर कोणता ब्लाऊज घालावा, याबद्दल अनेकींचा गोंधळ उडतो.
2 / 10
या दिवाळीत आपण एक प्लेन साडी (Plain Saree) आणि एक डिझायनर ब्लाऊज (Designer Blouse) यांचे देखणे कॉम्बिनेशन नक्की ट्राय करू शकता. हे कॉम्बिनेशन तुम्हाला एक 'मिनिमल' पण आकर्षक आणि स्पेशल लूक देईल, ज्यामुळे तुम्ही अगदी गर्दीतही उठून दिसाल.
3 / 10
साडी प्लेन असली, तरी डिझायनर ब्लाऊजमुळे तिला एक मॉडर्न आणि एलिगंट (Plain saree with designer blouse combinations) टच मिळतो. प्लेन साडीमुळे तुमच्या ब्लाऊजची डिझाईन आणि रंग अधिक खुलून येतो. तसेच, दागिने आणि ॲक्सेसरीज निवडतानाही तुम्हाला हवे तसे निवडता येतात. प्लेन साडी, जसे की सॅटिन सिल्क, शिफॉन किंवा जॉर्जेट यामुळे तुमचा लूक हलका आणि आरामदायक राहतो.
4 / 10
प्लेन साडी आणि डिझायनर ब्लाऊज या कॉम्बिनेशनमुळे तुमचा पारंपरिक लूक अधिक ट्रेंडी आणि सणासुदीच्या वातावरणाला साजेसा दिसतो.
5 / 10
पूर्ण सिक्वीन वर्क केलेला ब्लाऊज किंवा हेवी फ्लोरल/पॅटर्न एम्ब्रॉयडरी असलेला ब्लाऊज तुमच्या प्लेन साडीला अधिक खास आणि सुंदर लूक देतो. सिक्वीन ब्लाऊज निवडल्यास, साडीच्या रंगाच्या कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाऊज निवडा, जसे की काळ्या साडीवर गोल्ड किंवा सिल्व्हर सिक्वीनचा ब्लाऊज.
6 / 10
प्लेन साडीवर, खांद्यावर किंवा कोपरापाशी पफ असलेले ब्लाऊज किंवा फुल स्लीव्ह आणि हाताच्या टोकावर सुंदर लेस असलेले ब्लाऊज अधिक जास्त शोभून दिसतील.
7 / 10
हेवी टेक्श्चर आणि विणकाम असलेला ब्रोकेड किंवा बनारसी सिल्कचा ब्लाऊज, हे ब्लाऊज खूप आकर्षक दिसतात. मरून, रॉयल ब्लू किंवा गडद हिरवा यांसारख्या तेजस्वी रंगांच्या साड्यांवर हे ब्लाऊज चांगले दिसतात.
8 / 10
प्लेन लाईटवेट शिफॉन किंवा जॉर्जेट साडीवर शर्टसारखी कॉलर असलेला किंवा नोटेचेड नेकलाईन असलेला ब्लाऊज हा लूक खूप ट्रेंडी आणि कूल दिसतो. कॉलरला छोट्या टिकल्या किंवा कुंदन लावून अधिक आकर्षक बनवू शकता.
9 / 10
खांदे मोकळे ठेवणारा ऑफ-शोल्डर किंवा गळ्याभोवती बांधला जाणारा हॉल्टर नेक ब्लाऊज, सॅटिन, ऑर्गेन्झा यांसारख्या फॅब्रिकच्या साड्यांवर शोभून दिसतो. या ब्लाऊजसोबत हेवी ज्वेलरी घालू नका. फक्त मोठे झुमके किंवा एक स्टेटमेंट नेकलेस पुरेसा आहे.
10 / 10
या दिवाळीत प्लेन साडी आणि डिझायनर ब्लाऊजचे हे कॉम्बिनेशन ट्राय करून तुम्ही तुमचा फेस्टिव्ह लूक नक्कीच स्टायलिश आणि खास करू शकता!
टॅग्स :fashionफॅशनStyling Tipsस्टायलिंग टिप्सsaree drapingसाडी नेसणे