शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लहान मुलांसमोर वागताना घ्यायला हवी 'ही' काळजी, मुलांसमोर बोलताना झालेली चूक पडेल महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2025 14:45 IST

1 / 10
लहान मुलांची स्मरणशक्ती फार चांगली असते. एका ठराविक वयात त्यांनी ऐकलेल्या गोष्टी ते सहसा विसरत नाहीत. त्यामुळे त्याच्या समोर काहीही बोलताना फार काळजी घ्यायला हवी.
2 / 10
आपण पटकन काही बोलून जातो आणि मुलांच्या ते कायम लक्षात राहते. फक्त लक्षात राहत नाही तर ते तसं वागतातही आणि बोलतातही. त्यामुळे काळजी घेणे फार गरजेचे असते. अशा काही गोष्टी आहेत ज्या चुकूनसुद्धा लहान मुलांसमोर बोलू नयेत. तसेच काही सवयी आहेत ज्या लहान मुलांना पालकांनी लावू नयेत.
3 / 10
आजकाल मुलांची अतिकाळजी घेतली जाते. त्यामुळे मुले जास्त हळवी आणि कमकुवत होतात. लहानपणापासूनच मुलांना स्वावलंबी होण्यासाठी आणि मनाने खंबीर होण्यासाठी पालक मदत करु शकतात. लहान सहान गोष्टींमध्ये जास्त काळजी घेण्याऐवजी मुलांना स्वत:हून शिकू द्या.
4 / 10
मुलांसमोर पालकांनी भांडू नये. त्यांना तुमचे वागणे पाहून तशीच वागायची सवय लागते. त्यामुळे एखाद्या परिस्थितीत असे भांडणे योग्यच असा विचार मुलांमध्ये रुजू होतो आणि त्याचा स्वभाव चिडचिडा होतो. मुले भांडकूदळ होतात. त्यामुळे मुलांसमोर मोठ्या आवाजात बोलणे टाळा.
5 / 10
मुलांसमोर पालकांनी भांडू नये. त्यांना तुमचे वागणे पाहून तशीच वागायची सवय लागते. त्यामुळे एखाद्या परिस्थितीत असे भांडणे योग्यच असा विचार मुलांमध्ये रुजू होतो आणि त्याचा स्वभाव चिडचिडा होतो. मुले भांडकूदळ होतात. त्यामुळे मुलांसमोर मोठ्या आवाजात बोलणे टाळा.
6 / 10
सतत चुका काढणे तसेच मुलांना आणखी चांगले करण्यासाठी प्रवृत्त करणे योग्य नाही. त्यांना स्वतःबद्दल न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मुलांना कायम योग्य मार्गानेच आणखी यशस्वी होण्यासाठी मदत करावी. त्यांच्या लहान आनंदातही सहभागी व्हावे.
7 / 10
लहान मुलांना शिस्त लावणे गरजेचेच आहे. मात्र उठसूट त्यांच्यावर ओरडणे चांगले नाही. असे केल्याने मुले खोटं बोलायला लागतात. चुका झाल्यावर पालकांशी संवाद साधत नाहीत. लहान चुकांचे रुपांतर मोठ्यांमध्ये होते आणि पुढेही तसेच राहते. पालकांनी ओरडतानाही जरा काळजी घ्यावी.
8 / 10
अगदी साध्या सवयी लावायला विसरु नका. जसे की थॅक्यू बोलणे आणि सॉरी बोलणे अशा सवयी मुलांना लावा. त्यांचे व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी फायद्याचे ठरेल. लोकांचा विचार करुन वागण्याची भावना मुलांमध्ये निर्माण होईल.
9 / 10
आजकाल पालक मुलांना भरमसाठ क्लास लावतात. डान्स, गाणं, अभ्यास, खेळ सारेच मुलांना जमावे अशी त्याची अपेक्षा असते. त्यामुळे मुलांच्या डोक्यावर आणि शरीरावर प्रचंड ताण येतो. त्यांना त्यांचे आयुष्य सुखात जगू देणे पालकांच्या हातात असते. त्यामुळे मुलांच्या क्षमतेनुसारच त्यांना कृती करु द्या.
10 / 10
मुलांसमोर अपशब्द वापरणे टाळा. ते लगेच शिकतात आणि वापरतातही. त्यामुळे मुलांशी बोलताना शब्दांची आणि उदाहरणांची निवड करताना काळजी घ्या.
टॅग्स :Parenting Tipsपालकत्वSocial Viralसोशल व्हायरलHome remedyहोम रेमेडी