लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
1 / 9गौरी गणपतीचा सण आला की अनेक जणी हमखास पारंपरिक वेशभूषेत दिसून येतात. आता पारंपरिक वेशभूषा करायची म्हणजे नाकात ठसकेबाज नथ हवीच..2 / 9म्हणूनच सणासुदीच्या निमित्ताने तुम्हालाही नथ खरेदी करायची असेल तर या काही एकदम नव्या आकर्षक, सुंदर डिझाईन्स बघा... 3 / 9मासोळीचा आकार असणारी ही एक सुंदर नथ. स्टोन आणि मोती या दोन्हींमुळे ही नथ अतिशय आकर्षक दिसते. 4 / 9मोराचे डिझाईन आवडत असेल तर हा एक छानसा पर्याय बघा..5 / 9बानाई नथ ही फक्त मोत्यांमध्येच दिसत होती. पण आता सोनेरी मण्यांमध्येही ती आली आहे. त्यामुळे बानाई नथीतला हा एक नवा प्रकार तुम्हाला आवडू शकतो..6 / 9वरती ठसठशीत फुल आणि खाली मोत्यांचा वेल ही नथ तर बघताक्षणीच कोणालाही आवडेल अशी आहे. 7 / 9हे डिझाईन तर अगदीच वेगळे आहे. त्यामुळे इतरांपेक्षा काही वेगळं घ्यायचं असेल तर लगेच अशा पद्धतीची नथ घेऊन टाका.8 / 9या नथीचा आकार खूप वेगळा आहे. तुम्हाला नथ घालुन थोडासा ट्रेंडी लूक करायचा असेल तर हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.9 / 9या नथीचा आकार बघा... मधोमध फुल, त्याच्या बाजूने दोन बारीक कोयरी आणि त्याला मोत्यांची झालर असे अतिशय आगळेवेगळे डिझाईन असणारी ही नथ खूपच मोहक आहे.