शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

होळी रे होळी!! नखांवरचा रंग लवकर निघत नाही? होळी खेळण्यापूर्वी 'अशी' घ्या काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2025 18:49 IST

1 / 8
होळी आली की, बाजारात सर्वत्र मिठाई, रंग आणि पिचकाऱ्या पाहायला मिळतात. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला होळीचे रंग खेळायला आवडतात. अनेकदा होळीचे रंग इतके गडद असतात की, चेहरा किंवा नखांना लागले की लवकर निघत नाही. (Nail care tips before and after Holi)
2 / 8
जर आपणही होळीचे रंग खेळणार असू तर त्वचेसोबतच नखांची देखील काळजी घ्यायला हवी. (How to remove Holi color from nails)
3 / 8
होळी खेळण्यापूर्वी आपण त्वचेची आणि केसांची पुरेपूर काळजी घेतो. परंतु नखांकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे नखांवरचा रंग सहज निघत नाही. (Best ways to protect nails during Holi)
4 / 8
नखांना होळीच्या रंगापासून वाचवायचे असेल तर हाताच्या आणि पायाच्या नखांना डार्क नेलपॉलिशचा लावा. नेलपॉलिश लावताना ती नखाच्या कोपऱ्यापासून लावा, यामुळे नखांवर रंग लागणार नाही. होळी खेळल्यानंतर नेलपॉलिश रिमूव्हरने स्वच्छ करा.
5 / 8
होळीपूर्वी नखांवर आणि त्यांच्या कडांवर व्हॅसलीन किंवा कोणतेही मॉइश्चरायझर लावा. असे केल्याने नखांवर रंग चिकटणार नाही. नखे सहज स्वच्छ करण्यास मदत होईल.
6 / 8
आपल्याला व्हॅसलीन लावायचे नसेल तर नारळाचे तेल नखांना लावू शकतो. तेलाच्या थरामुळे नखांमध्ये रंग अडकणार नाही. साबणाने हात स्वच्छ केल्यास रंग निघून जातील.
7 / 8
रंग खेळताना आपण वारंवार हात धुवायला हवे. यामुळे हातावर रंग पक्का होण्यापूर्वी निघून जाईल.
8 / 8
रंग अधिक गडद असेल आणि नखांमध्ये अडकला असेल तर कोमट पाण्यात बदामाचे तेल किंवा व्हिनेगर घाला. यामध्ये नखे काही वेळ ठेवा,त्यामुळे नखांचा रंग निघून जाण्यास मदत होईल.
टॅग्स :Holiहोळी 2025Beauty Tipsब्यूटी टिप्सWomenमहिलाLifestyleलाइफस्टाइल