शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

नथीचा नखरा! लग्नसराईत काठपदराच्या साडीवर हवाच नथीचा ठसठसशीत आकडा, पाहा सुंदर डिझाइन्स - पारंपरिक आणि मॉडर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2025 21:16 IST

1 / 9
लग्न समारंभात स्त्रीच्या रुपातील महत्त्वाचा आणि देखणा दागिना म्हणजे नथ. हा तिच्या परंपरेचा आणि सौंदर्याचा भाग मानला जातो. लग्नसराईत महिला पारंपरिक किंवा काठपदराची साडी नेसतात. नऊवारी किंवा जरीच्या साडीवर नथ आवर्जून घालतात. (Maharashtrian nath designs)
2 / 9
महाराष्ट्रीयन नथांमध्ये विविध प्रकार आपल्याला हमखास पाहायला मिळतात. पारंपरिक बांधणीपासून ते अत्याधुनिक फॅशन ट्रेंडपर्यंत. सध्या बाजारात विविध नथीच्या डिझाइन्स आहेत. त्यात पर्ल्स, कलरफुल स्टोन्स, इंट्रिकेट गोल्डवर्क, लाइटवेट मेटल. जर यंदा आपल्याही घरात लग्न असेल किंवा नववधुसाठी खास नथीचा दागिना शोधत असाल तर या सुंदर, मॉडर्न डिझाइन्स पाहा. (Marathi bridal nose ring)
3 / 9
सध्या बाजारात कमळाची नथ अधिक ट्रेडिंग आहे. यामध्ये मोती, कमळाचे फूल आणि डायमंड पाहायला मिळतील. यामुळे आपला लूक छान दिसेल.
4 / 9
राजेशाही पेशवाई नथ ही पुर्वीपासूनच पाहायला मिळते. ही नथ सोने किंवा चांदीच्या धातूमध्ये बनवली जाते. पांढऱ्या रंगाचे ठसठशीत मोती, त्यावर डायमंड असतात. ज्यामुळे आपल्याला राजेशाही लूक मिळतो. जर आपण लग्न राजेशाही थाट करणार असाल तर पेशवाई नथ नक्की ट्राय करा.
5 / 9
पारंपरिक साडीवर मॉडर्न लूक द्यायचा असेल तर हिऱ्यांनी जडवलेली महाराष्ट्रीयन नथ नक्की ट्राय करा. या डिझाइन्समध्ये सोन्यासह पांढरे मोती आणि संपूर्ण डायमंड असतात. ज्यात आपण छान दिसू.
6 / 9
जर आपल्याला साखळी नथ ट्राय करायची असेल तर या अनेक ट्रेडिंग पॅटर्न आहेत. मोत्याची साखळी नथ ही ट्रेंडी डिझाइन्स आहे. पारंपारिक नथसह नाजूक मोत्याची साखळी असलेले हे डिझाइन क्लासिक नथला सुंदर बनवते.
7 / 9
फुलांच्या डिझाईन्सची आवड असलेल्या महिलांसाठी फुलांची, मोरांची नथ आहे. सोनेरी आणि मुलामा चढवलेल्या कामाने बनवले जाते.
8 / 9
पाचू नथची डिझाइन सध्या कमी पाहायला मिळते. पण जर आपल्या साडीला मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट करायचं असेल तर ही नथ आपण नक्की ट्राय करु शकतो.
9 / 9
सध्या बाजारात 'आहो' नावाची नथ देखील ट्रेंडिंग आहे. नववधु आपल्या लग्नात ट्राय करु शकते.
टॅग्स :WeddingशुभविवाहfashionफॅशनWomenमहिला