शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

खणाच्या ब्लाऊजचे १० मॉडर्न डिझाइन्स, पारंपरिक पण स्टायलिश लूक! सुंदर ‘खण’खणीत सौंदर्य...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2025 20:30 IST

1 / 12
सध्या पारंपरिक खणाची फॅशन पुन्हा एकदा नव्याने ट्रेंडमध्ये (Khan Blouse Design) आली आहे. फॅन्सी, सिल्क, काठापदराच्या साड्यांपेक्षा सध्या खणांच्या साड्यांची क्रेज महिलांमध्ये जास्त पाहायला मिळते. या खणाच्या साड्यांवर नेहमीचे तेच ते ब्लाऊजचे जुने पॅटर्न शिवण्यापेक्षा सुंदर व आकर्षक पॅटर्नचं ब्लाऊज शिवल्याने आपला लूक अधिकच उठून दिसतो.
2 / 12
काहीवेळा खणाच्या पारंपरिक साड्यांवर कोणत्या पॅटर्नचे ब्लाऊज ( Khan Blouse Trendy Patterns) शिवायचे असा प्रश्न पडतो. यासाठीच, तुमच्या खणाच्या पारंपरिक साडीला हटके आणि मॉडर्न लूक द्यायचा असेल तर ट्रेंडी व मॉडर्न पॅटर्नचे ब्लाऊज खूप सुंदर दिसतील... खण साडीवर घालता येतील असे मॉडर्न पॅटर्नचे ब्लाऊज डिझाईन्स पाहूयात.
3 / 12
१. तुम्ही खणं साडीवर अशा प्रकारचे मागच्या बाजूला वेगवेगळे पॅटर्न किंवा दोरी असणारे ब्लाऊज शिवू शकता.
4 / 12
२. पाठीवर नथीच्या ब्लाऊजची फॅशन सध्या तुफान चर्चेत आहे. तुम्ही खणं साडीवर असं एखादं ब्लाऊज शिवल्यास नक्की डिसेंट लूक मिळेल.
5 / 12
३. याचबरोबर तुम्ही खणं साडीवर वेगवेगळ्या पॅटर्नचे खणाचे ब्लाऊज शिवू शकता. अशा प्रकारे पाटीवर वेगवेगळ्या पद्धतीने केलेलं वर्क असणारे ब्लाऊज तुम्हाला सुंदर लूक देतील.
6 / 12
४. तुम्ही अशाप्रकारे ब्लाऊजच्या मागच्या बाजूने बटन्स लावून वेगळ्या पॅटर्नचे ब्लाऊज शिवू शकता. जर तुम्हाला एकदम साधासुधा पारंपरिक लूक हवा असेल तर तुम्ही अशाप्रकारे ब्लाऊज शिवू शकता.
7 / 12
५. पारंपरिक खणाच्या साडीवर तुम्हाला बोल्ड आणि क्लासी लूक हवा असेल तर तुम्ही अशाप्रकारचा खणाचा बॅकलेस ब्लाऊज शिवला तर तुमचा लूक एकदम हटके दिसेल.
8 / 12
६. खणाच्या ब्लाऊजच्या मागच्या - पुढच्या गळ्याचे असे पॅटर्न शिवूंन तुम्ही डोरी स्टाईल करुन डोरीला गोंडे देखील लावून सजवू शकता.
9 / 12
७. तुमच्या साडीत वेगवेगळे रंग असतील किंवा एकच ब्लाऊज सगळ्या खणं साड्यांवर मॅच करायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारचा एक मल्टीकलर ब्लाऊज शिवू शकता. मल्टी कलरच्या ब्लाऊजमध्ये वेगवेगळ्या रंगांची सरमिसळ असल्याने सुंदर लूक मिळेल.
10 / 12
८. खण ब्लाऊजला अधिक सुंदर आणि मॉडर्न लूक देण्यासाठी तुम्ही अशाप्रकारे बॅक डिप नेक आणि पफ स्लिव्ह्ज पॅटर्न शिवून पारंपरिक खणं ब्लाऊजला मॉडर्न टच देऊ शकता.
11 / 12
९. जर तुम्हाला पारंपरिकता आणि आधुनिकता असा दोन्ही प्रकारचा लूक हवा असेल तर तुम्ही अशा प्रकारे कॉलर नेक असणारा खणं ब्लाऊज शिवू शकता.
12 / 12
१०. ब्लाऊजच्या पुढच्या बाजूने बटणं आणि साडीचा काठ लावून तुम्ही तुमच्या खणं ब्लाऊजला मॉडर्न टच देऊ शकता.
टॅग्स :fashionफॅशनStyling Tipsस्टायलिंग टिप्स