शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

लग्नसराईसाठी खास काश्मिरी देझुर झुमक्यांची ट्रेंडिंग फॅशन! डिझाईन्स इतके मोहक की, दिसाल काश्मीर की कली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2025 14:48 IST

1 / 12
लग्नसराई सुरू झाली की साडी, लेहेंगा, मेकअपसोबत दागिन्यांची निवडही तितकीच महत्त्वाची ठरते. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं म्हणून पारंपरिक आणि रॉयल लुक हवा असेल तर काश्मिरी देझुर (Dejhoor) झुमके हा एक परफेक्ट पर्याय आहे(Kashmiri Dejhoor Jhumka Earrings Designs for Wedding Season).
2 / 12
काश्मीरमधील नववधूंसाठी हे झुमके सौभाग्याचे प्रतीक मानले जातात. देझुर (Dejhoor) झुमके हा कानातल्यांचा प्रकार, काश्मिरी संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचे आणि पवित्र पारंपरिक आभूषण आहे. हा एक केवळ (kashmiri dejhoor jhumka earrings) दागिना नसून, विवाहित स्त्रीची ओळख आणि तिचा सौभाग्य अलंकार मानला जातो.
3 / 12
लग्नाच्या सिझनसाठी खास, आकर्षक आणि ट्रेंडिंग काश्मिरी देझुर झुमक्यांची हटके (traditional kashmiri dejhoor earrings) फॅशन पहायला मिळते, इतकेच नाही तर या प्रकारचे कानातले घालण्याचा एक नवा हटके ट्रेंड सध्या सुरु आहे.
4 / 12
लखलखत्या सोनेरी रंगातील हे पारंपरिक देझुर झुमके नववधूला राजेशाही लुक देतात. लाल किंवा मरून रंगाच्या साडीवर हे झुमके खास उठून दिसतात.
5 / 12
कुंदन आणि मोत्यांच्या नाजूक कामामुळे हे देझुर झुमके लग्नासाठी अत्यंत एलिगंट दिसतात. हलक्या फिक्या रंगाच्या लेहेंग्यावर हे डिझाईन खूपच शोभून दिसते.
6 / 12
चांदीच्या फिनिशमधील देझुर झुमके पारंपरिकतेसोबत मॉडर्न टच देतात. रिसेप्शन किंवा साखरपुड्यासाठी हे डिझाईन उत्तम पर्याय आहे.
7 / 12
हिरवे, लाल आणि निळ्या रंगाच्या स्टोन्सनी सजलेले देझुर झुमके नववधूच्या लूकमध्ये रंगांची उधळण करतात. हे डिझाईन खूपच सुंदर दिसते, स्टोन्सचे वर्क असल्यामुळे हे कानातले नाजूक आणि सुंदर लूक हटके लूक देतात. सोने किंवा चांदीच्या देझुरमध्ये हिरवा, लाल किंवा निळा रंग भरून मीनाकारीचे बारीक काम केलेले असते. झुमक्याच्या कडांना रंगीत मीनाकारीमुळे ते अधिक आकर्षक दिसतात.
8 / 12
देझुरच्या बेसला खाली मोत्यांचे मोठे गुच्छ किंवा माणिक, पाचू, नीलम यांसारखे मौल्यवान खडे जडवलेले झुमके जोडलेले असतात. यामुळे त्यांना राजेशाही लुक येतो.
9 / 12
भारी आणि मोठ्या आकाराचे देझुर झुमके खास ब्रायडल लुकसाठी डिझाइन केलेले असतात. पारंपरिक काश्मिरी दागिन्यांचा हा सर्वात खास प्रकार मानला जातो.
10 / 12
ज्यांना साधा पण क्लासी लुक हवा आहे त्यांच्यासाठी मिनिमल डिझाईनमधील देझुर झुमके बेस्ट ऑप्शन ठरतात. मेहंदी किंवा हळदी समारंभासाठी अशा प्रकारचे सुंदर पण नाजूक डिझाईन्समधील कानातले शोभून दिसतात.
11 / 12
काश्मिरी पारंपरिक देझुर झुमके हे केवळ दागिने नसून ते संस्कृती, परंपरा आणि सौंदर्य यांचे प्रतीक आहेत. या लग्नाच्या सिझनमध्ये जर तुम्हाला वेगळा आणि रॉयल लुक हवा असेल तर काश्मिरी देझुर झुमके नक्की ट्राय करा.
12 / 12
हे झुमके काश्मिरी फेरन, गरारा, किंवा हेव्ही वर्क किंवा भरतकाम केलेल्या साडी, ड्रेस, लेहेंग्यावर खूपच शोभून दिसतात. हे खास देझूर झुमके दिसावेत म्हणून, केसांचा अंबाडा किंवा अर्धे बांधलेले असावेत.
टॅग्स :WeddingशुभविवाहfashionफॅशनStyling Tipsस्टायलिंग टिप्स