शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कढीपत्त्याचे रोप वाढेल भरभर, येतील हिरवीगार पानं- हिवाळ्यात फक्त ५ गोष्टींची काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2025 16:21 IST

1 / 7
कढीपत्ता हा फक्त पदार्थांची चव वाढवत नाही तर आपले आरोग्य सुधारण्याचे काम करतो. आपल्यापैकी अनेकांच्या घरात, अंगणात किंवा बाल्कनीत कढीपत्त्याचे रोप पाहायला मिळते. पण हिवाळा सुरु झाला की त्याचा झाडांच्या वाढीवर थोडासा परिणाम होतो. (curry leaf plant care in winter)
2 / 7
हिवाळ्यात कढीपत्त्याचे रोप सुकते, बुरशी लागते किंवा पान गळतात. कढीपत्त्याच्या रोपाची वाढ देखील थांबते. पानेही पिवळी पडू लागतात. अशावेळी रोपांची काळजी कशी घ्यावी जाणून घेऊया. (how to grow curry leaves fast)
3 / 7
कढीपत्त्याचे झाड लावण्यासाठी आपल्याला नर्सरीमधून ते आणावं लागेल किंवा त्याच्या बिया देखील लावू शकतात. यासाठी कुंडीत माती सुमारे १ इंच खोल ठेवा. त्यात थोडे पाणी घाला. आणि सूर्यप्रकाश ज्या ठिकाणी असेल तिथे ठेवा.
4 / 7
कढीपत्त्याची वाढ होण्यासाठी त्यात माती हलकी आणि पाण्याचा निचरा होणारी असायला हवी. ते लावण्यासाठी सगळ्यात आधी कुंडी घ्या. रोप वाढत असताना, ते एका मोठ्या कुंडीत घाला. सूर्यप्रकाशात दररोज ५ ते ६ तास ठेवा.
5 / 7
हिवाळ्यात आठवड्यातून २ ते ३ वेळा पाणी द्या, माती ओली राहणार नाही याची खात्री करा.
6 / 7
रोपाला १५ ते २० दिवसांनी शेणखत टाका. कीटकांना दूर ठेवण्यासाठी झाडावर कडुलिंबाचे तेल फवारणी करा.
7 / 7
कढीपत्त्याच्या रोपट्याला व्यवस्थित ऊन मिळतेय का?, पाणी घालतानाही आपण योग्य ती काळजी घ्यायला हवी. रोपाची व्यवस्थितरित्या छाटणी देखील करायला हवी.
टॅग्स :Gardening Tipsबागकाम टिप्स