शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

साडीत बारीक कसं दिसायचं? ८ टिप्स; पोट जराही दिसणार नाही-स्लिम दिसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 19:13 IST

1 / 8
साडी नेसल्यानंतर आपण स्लिम, मेंटेन व्यवस्थित दिसावं असं प्रत्येकालाच वाटतं. पण बऱ्याचजणांना साडी व्यवस्थित नेसता येत नाही. साडी नेसल्यानंतर बारीक दिसण्यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया.(How To Look slim In Saree)
2 / 8
साडीखाली साडी शेपरचा वापर करा. यामुळे पोटाचा आणि कंबरेचा भाग व्यवस्थित दाबून ठेवता येतो आणि साडीला परफेक्ट शेप येतो. ज्यामुळे पोट दिसत नाही.(How To Look Slim In Saree 8 Tips Saree Styling Tips)
3 / 8
जॉर्जेट, शिफोन, क्रेप किंवा सॉफ्ट सिल्कसारख्या हलक्या फॅब्रिकच्या साड्या निवडा. या साड्या शरीराला व्यवस्थित चिकटतात आणि फुगत नाही ज्यामुळे तुम्ही बारीक दिसता.
4 / 8
साडी कमरेभोवती खूपच घट्ट आणि बेंबीच्या थोडीवर नेसा यामुळे पोटाचा खालचा भाग दबला जातो.
5 / 8
साडीच्या निऱ्या शक्य असल्यास बारीक काढा. त्या नाभीच्या अगदी मध्यभआगी खोचा त्या डाव्या बाजूला सरकू देऊ नका.
6 / 8
पदर पिन-अप करताना तो खांद्यावर थोडा सैल सोडा. यामुळे छाती आणि पोटाचा भाग सहज झाकला जातो.
7 / 8
ब्लाऊजची लांबी किंवा कॉर्सेट स्टाईलचा ब्लाऊज निवडल्यास पोटाचा बराच भाग झाकला जाऊ शकतो.
8 / 8
लहान प्रिंट्स आणि गद रंगाच्या साड्या बारीक दिसण्यास मदत करतात. मोठ्या भरजरी प्रिंट्स टाळा. पातळ किंवा मध्य रूंदीची बॉर्डर असलेल्या साड्या निवडा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्मविश्वास, साडी कशी दिसेल याची चिंता न करता आत्मविश्वासानं ती परीधान करा.
टॅग्स :saree drapingसाडी नेसणेfashionफॅशन