1 / 8उन्हाळा सुरू झाला की हमखास आंब्याचे वेध लागतात. कधी एकदा आंब्याची गोडी चाखून बघतो, असं होतं.2 / 8आता आंबा घ्यायचा तर हापूसच घ्यावा, असं अनेकांना वाटतं. त्यासाठी विक्रेते मागतील ती किंमत द्यायलाही अनेक जण तयार असतात. पण हल्ली या बाबतीत खूप फसवणूक वाढली असून कोकणातला हापूस म्हणून चक्क बरेच विक्रेते कर्नाटकी हापूस किंवा केरळी हापूस विकतात. 3 / 8आंबा घेताना आपलीही अशी फसवणूक होऊ नये म्हणून नेहमी ४ सोप्या गोष्टी लक्षात ठेवा. यामुळे तुम्ही देवगड- रत्नागिरीचा हापूस आणि केरळी- कर्नाटकी हापूस यांच्यातला फरक लगेच ओळखू शकाल.4 / 8हापूस आंबा घेताना तो कधीही नुसता वरवर बघून खरेदी करू नका. कारण दिसायला कोकणातला हापूस आणि कर्नाटकी हापूस हे दोन्हीही सारखेच दिसतात. त्यामुळे नेहमी चव घेऊन, आंबा चिरूनच तो खरेदी करा.5 / 8कोकणातला हापूस आंबा हा आतून केशरी रंगाचा असतो. तर कर्नाटक- केरळचा हापूस हा पिवळसर रंगाचा असतो.6 / 8कोकणातल्या हापूसचे साल पातळ असते तर कर्नाटकी हापूसचे साल जाडसर असते. 7 / 8कोकणातला हापूस हा अतिशय सुगंधी आणि गोड असतो. तर कर्नाटकी हापूसचा सुगंध अगदी कमी असतो. शिवाय तो सपक लागतो.8 / 8कोकणातला हापूस कधीही कागदी बॉक्समध्ये येत नाही. तो नेहमी लाकडी बॉक्समध्ये घालूनच विक्री केला जातो. कागदी बॉक्समध्ये येणारे आंबे हे कर्नाटक आणि केरळचे असतात.