शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात घरात गोम, गांडूळ निघतात? ४ उपाय- गोम येण्याचा धोका कायमचा टळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2025 17:54 IST

1 / 7
पावसाळ्याच्या दिवसांत घरात गोम निघण्याचं प्रमाण खूप वाढतं..
2 / 7
गोम जर चावली तर तिचा दंश कधीकधी जीवघेणाही ठरू शकतो. कारण तिचा दंश विषारी मानला जातो आणि तो झाल्यानंतर लगेचच योग्य ते औषधोपचार घेणं गरजेचं असतं.
3 / 7
पावसाळ्यात सगळीकडेच ओल असल्याने गोम निघण्याचं प्रमाणही खूप वाढतं. कधी कधी तर बाथरुममध्ये, वॉशिंग प्लेसमध्ये, अंगणातही गोम निघते. त्यामुळेच घरात गोम निघू नये म्हणून काही गोष्टींची खबरदारी घेणं गरजेचं आहे.
4 / 7
गोम निघू नये यासाठी सगळ्यात पहिला उपाय म्हणजे तुमच्या बाथरुमच्या, वॉशिंग प्लेसच्या भिंतींना काही छिद्रं असतील, भिंतींना भेगा पडल्या असतील तर त्या आधी बुजवून घ्या. कारण तिथून गोम निघण्याचं प्रमाण जास्त असतं.
5 / 7
व्हिनेगर आणि डेटॉल हे मिश्रण एकत्र करा आणि ते बाथरुममध्ये, खिडकीजवळ, बाथरुमधून पाणी वाहून जाण्याच्या जाळीवर शिंपडून ठेवा. त्याच्या वासामुळे गोम दूर जातात.
6 / 7
पेपरमिंट ऑईल आणि पाणी एकत्र करा आणि हे मिश्रणही बाथरुम, टॉयलेट, सिंक, बेसिन, वॉशिंग प्लेस अशा ठिकाणी नियमितपणे शिंपडा. यामुळेही गोम, गांडूळ दूर राहतात.
7 / 7
पुदिन्याच्या वासामुळेही गोम दूर जातात. त्यामुळे छोट्या छोट्या कुंडीमध्ये पुदिन्याची रोपं लावा आणि ती घरात ठिकठिकाणी ठेवा. गोम दूर जातील.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलCleaning tipsस्वच्छता टिप्सHome remedyहोम रेमेडीMonsoon Specialमानसून स्पेशल