शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

रातकिड्यांच्या किर्र.किर्र आवाजानं झोपचं खोबरं होतं? ‘हा’ उपाय करा, झोप लागेल शांत रोज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 20:00 IST

1 / 7
रात्रीच्या अंधारात शांततेचा भंग करत येणारा रीतकिड्याचा आवाज भल्याभल्यांच्या झोपेचं खोबरं करतो. पावसाळ्यात रातकीडे अधिक निघतात. जे घरात, घराच्या बाल्कनीत किंवा कुठेही येऊ शकतात. यांचा आवाज इतका कर्कश आणि चीड आणणारा असतो की, एक सेकंदही झोप लागत नाही. तुम्ही सुद्धा रातकिड्यांच्या कंटाळवाण्या आवाजाला वैतागला असाल तर काही सोपे उपाय करून तुम्ही त्यांना पळवून लावू शकता. पण अनेकांना हे उपायच माहीतच नसतात. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
2 / 7
गूळ हा रातकिडे घरातून पळवून लावण्याचा सोपा उपाय आहे. एका मोठ्या तोंडाच्या भांड्यात पाणी भरून त्यात गुळाचा खडा ठेवा. हे भांड रातकिडे जिथे जास्त येतात तिथे ठेवा. गुळाचा गंध रातकिड्यांना आकर्षित करतो. ते या गंधाच्या शोधात भांड्यात येऊन पडतील.
3 / 7
रातकिडे पळवून लावण्यासाठी बीअर फायदेशीर ठरते. बॉटलमध्ये थोडी बीअर ठेवून जिथे रातकिडे येतात तिथे ठेवा. बीअरचा गंध सुद्धा या किड्यांना आकर्षित करतो. गंधाचा पाठलाग करत रातकिडे बॉटलमध्ये येऊन पडतात.
4 / 7
घरातील लख्ख प्रकाशाकडे रातकिडे आकर्षित होतात. अशात तुम्हाला ते घरात येऊ नये असं वाटत असेल तर घरात पिवळ्या आणि निळ्या रंगाचे लाइट लावा. कारण या रंगाचे प्रकाश रातकिडे बघू शकत नाहीत.
5 / 7
सामान्यपणे रातकिडे ओलावा असलेल्या ठिकाणांवर अधिक लपतात. कुड्यांमध्ये, झाडांवर ते लपून बसतात. त्यामुळे स्वच्छता ठेवा आणि ओलावा कमी ठेवा.
6 / 7
बोरिक अ‍ॅसिड कीटकनाशकाच्या रूपात काम करतं. त्यामुळे हे अ‍ॅसिड रातकिडे येतात त्या ठिकाणी शिंपडा. भिंतीच्या भेगा, कोपऱ्यांमध्येही रातकिडे लपून बसतात, तिथेही हे शिंपडा.
7 / 7
रातकिड्यांना मसाल्यांचा गंध अजिबात आवडत नाही. अशात मिरची पावडर त्यांच्यापासून सुटका मिळवण्यासाठी चांगलं उपाय ठरू शकतो. यासाठी दोन कप पाण्यात साबणाच्या पाण्याचे काही थेंब टाका आणि त्यात मिरची पावडर टाका. हे मिश्रण रातकिडे येतात त्या ठिकाणी शिंपडा.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलCleaning tipsस्वच्छता टिप्स