शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

घरच्याघरी ब्लीच करणं आता झालं सोपं! 'या' पद्धतीने बटाटा वापरा- चेहरा होईल स्वच्छ, फ्रेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2025 09:30 IST

1 / 6
चेहऱ्यावरचं टॅनिंग कमी करून चेहरा छान स्वच्छ, चमकदार करायचा असेल तर पुढे सांगितलेल्या पद्धतीनुसार घरच्याघरी ब्लीच करून पाहा.
2 / 6
पार्लरमध्ये जाऊन बाॅडी पॉलिशिंग केल्याप्रमाणे त्वचा छान चमकदार होईल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला प्रामुख्याने बटाटा लागणार आहे.
3 / 6
हा उपाय करण्यासाठी बटाट्याचा रस एका वाटीमध्ये काढून घ्या. हा रस १५ ते २० मिनिटे झाकून ठेवा. यानंतर बटाट्याचं पाणी वरवर दिसेल आणि खाली स्टार्च जमा झालेलं असेल. स्टार्चमधून पाणी वेगळं करून घ्या.
4 / 6
आता जे बटाट्याचं पाणी असेल त्या पाण्यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ आणि अर्धा चमचा तुमचं नेहमीचं फेसवॉश घाला. हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि ते चेहऱ्याला लावून चेहरा हलक्या हाताने चोळून स्वच्छ धुवून घ्या.
5 / 6
यानंतर बटाट्याचं जे स्टार्च होतं त्यामध्ये एक चमचा कॉफी पावडर आणि अर्धा चमचा मध घाला. आता हा लेप चेहऱ्याला लावा आणि १० मिनिटे चेहऱ्यावर तसाच राहू द्या.
6 / 6
त्यानंतर हलक्या हाताने चोळून चेहरा धुवून टाका. चेहऱ्यावरचं टॅनिंग कमी होऊन त्वचेवर खूप छान चमक आलेली दिसेल.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजीHome remedyहोम रेमेडी