1 / 7स्वयंपाक घरात हात पुसण्याचे, भांडी पुसण्याचे नॅपकिन असतातच.2 / 7या नॅपकिनला वारंवार हात किंवा भांडी पुसल्यामुळे मग काही दिवसांतच नॅपकिन थोडे पिवळसर पडल्यासारखे होतात. ते आपण नेहमीच धुतो पण रोजच्या रोज त्यांच्यावर एवढे तेलकट हात, मसाल्यांचे हात लागलेले असतात की फक्त तेवढ्याच धुण्याने नॅपकिन स्वच्छ होत नाहीत. 3 / 7त्यांच्यामधून सारखा तेलकट वासही येतो. काही दिवसांनी मग ते नॅपकिन चिकट, कडक होऊन जातात. असं होऊ नये म्हणून आठवड्यातून एकदा पुढे सांगितलेल्या पद्धतीने नॅपकिन स्वच्छ करून पाहा..4 / 7हा उपाय करण्यासाठी एका बादलीमध्ये गरम पाणी घ्या. त्यामध्ये एक ते दोन लिंबांचा रस, १ चमचा बेकिंग सोडा आणि चमचाभर मीठ घालून ठेवा. 5 / 7आता मीठ पाण्यात विरघळलं की त्यामध्ये नॅपकिन भिजत घाला. पाणी कोमट होईपर्यंत नॅपकिन त्यामध्ये भिजू द्या.6 / 7त्यानंतर त्या पाण्यामध्ये कोणतंही डिशवॉश लिक्विड घाला आणि पुन्हा १० ते १५ मिनिटे नॅपकिन त्यामध्ये बुडवून ठेवा. 7 / 7यानंतर नॅपकिन पाण्यातून काढून घ्या आणि ब्रशने घासून काढा. नॅपकिन अगदी स्वच्छ झालेलं दिसेल आणि त्याला येणारा कुबट, तेलकट वासही गेलेला असेल.