शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Navratri Alata Designs : नवरात्रीत पायाला लावा 'आलता', ५ सुंदर डिझाईन्स- पाहा पारंपरिक पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2025 17:31 IST

1 / 8
नवरात्र म्हणजे आनंद आणि उत्साहाचा सण. या काळात गरबा आणि दाडिंया खेळले जातात. पण काही पारंपरिक पद्धती देखील सांभाळल्या जातात. यानिमित्ताने हातावर मेहेंदी किंवा पायावर आलता देखील लावला जातो. (Traditional alata for feet)
2 / 8
नवरात्रीत पायांना आलता लावणं ही केवळ परंपरा नाही तर सौंदर्याचा एक भाग देखील आहे. फुले, पाकळ्या, चंद्र -तारे यांसारख्या विविध डिझाईन्सने आपले पाय अधिक आकर्षक करु शकतो. (Alata designs for Navratri)
3 / 8
हल्ली बाजारात विविध प्रकारच्या आलता डिझाईन्स पाहायला मिळतात. ज्यात फुले - पाने किंवा इतर नक्षीकाम केलेले असते.
4 / 8
आपण पायांच्या बोटांना रंगवून मध्यभागी फुले किंवा पानांची डिझाईन्स बनवू शकतो.
5 / 8
आलताने गोल चंद्र बनवून त्याच्या अवतीभोवती ठिपके काढू शकतो.
6 / 8
पायांच्या मध्यभागी एक बिंदू बनवून त्यांना पाकळ्यांसारखा आकार देऊन सजवा. यामुळे पायांना पारंपरिक आणि आकर्षक लूक मिळेल.
7 / 8
पायांच्या बोटांवर गुलाबाची फुले आणि कडांवर पाने बनवून पायांना अधिक शाही लूक देऊ शकते.
8 / 8
आपण आलता आणि मेहंदीचे मिश्रण लावून पायांना अधिक आकर्षक बनवू शकतो. मेहंदी डिझाईनमध्ये आलता घालून डिटेलिंग केल्याने पाय आणखी ग्लॅमरस दिसतील.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स