1 / 7केस गळण्याच्या समस्येने हैराण झाला असाल तर हा एक सोपा उपाय लगेचच घरच्याघरी करून पाहा.2 / 7घरच्याघरी काही पदार्थ घेऊन पुढे सांगितल्याप्रमाणे हेअर मास्क तयार करा आणि आठवड्यातून एकदा तो केसांच्या मुळाशी लावा. यामुळे काही दिवसांतच केस गळणं कमी होऊन त्यांची भराभर वाढ होईल.3 / 7हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये १ चमचा खोबरेल तेल घ्या. त्यामध्ये १ चमचा कॅस्टर ऑईल घाला. केसांची मुळं पक्की करून केसांना मॉईश्चराईज करण्यासाठी कॅस्टर ऑईल उपयुक्त ठरते.4 / 7आता या मिश्रणात १ चमचा ॲलोव्हेरा जेल घाला. ॲलोव्हेरा जेलमुळे केसांचा राठपणा कमी होऊन ते मऊ होण्यास मदत होते.5 / 7यानंतर १ चमचा मध घाला. मधामुळे केसांमधले नॅचरल मॉईश्चर टिकून राहाते तसेच केस मुळांपासून पक्के होण्यास मदत होते.6 / 7सगळ्यात शेवटी या मिश्रणात २ ते ३ थेंब रोजमेरी तेल घाला. केसांच्या वाढीसाठी ते अतिशय चांगले आहे. आता सगळे पदार्थ व्यवस्थित कालवून एकत्र करा आणि केसांच्या मुळाशी लावा.7 / 7यानंतर साधारण अर्ध्या ते पाऊण तासाने केस धुवून टाका. आठवड्यातून एकदा हा उपाय करा. केस छान वाढतील.