1 / 7आपण सगळेच आपल्या त्वचेची (give up the chemical products and go for the ayurvedic products) काळजी घेतो. त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या स्किन केअर प्रॉडक्ट्सचा वापर करतोच. परंतु या स्किन केअर प्रॉडक्ट्समध्ये खूप जास्त प्रमाणांत केमिकल्स वापरलेले असतात, जे आपल्या त्वचेसाठी हानिकारक असतात. यासाठीच, हे सगळे स्किन केअर प्रॉडक्ट्स बदलून तुम्ही आयुर्वेदानुसार सांगितलेले काही खास उपाय देखील करु शकता. 2 / 7आजच तुम्ही तुमचे स्किन केअर केमिकल्सयुक्त (Ayurvedic Products Best For Skin Care) प्रॉडक्ट्सऐवजी त्या जागी 'या' काही खास नैसर्गिक पदार्थांचा वापर करू शकता, ते नेमके कोणते ते पाहूयात. 3 / 7 दिवसातून आपण २ ते ३ वेळा फेसवॉश करतो. फेसवॉश करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे फेसवॉश वापरतो. परंतु तुम्ही फेसवॉशच्या जागी तुम्ही बेसनात हळद, दही मिक्स करून त्याचा फेसवॉश म्हणून वापर करु शकता. तसेच फेसवॉश म्हणून तुम्ही काकडीचा रस किंवा गुलाबपाण्याच्या देखील वापर करू शकता. 4 / 7जर तुम्ही त्वचेसाठी टोनर म्हणून केमिकल्सयुक्त प्रॉडक्ट्स वापरत असाल तर त्याऐवजी, आपण गुलाबपाणी, एलोवेरा जेल आणि चंदनाचा देखील वापर करू शकता. 5 / 7मॉइश्चरायझर म्ह्णून महागड्या क्रिम लावण्यापेक्षा तुम्ही वेगवेगळ्या नैसर्गिक तेलांच्या वापर मॉइश्चरायझर म्ह्णून करु शकता. त्वचेला मॉइश्चराइझ करण्यासाठी तुम्ही खोबरेल तेल, बदामाचे तेल तसेच तिळाच्या तेलाचा देखील वापर करु शकता. त्वेचेसाठी इतर कोणत्याही तेलापेक्षा तीळाचे तेल हे एक उत्तम मॉइश्चराझर आहे. 6 / 7सनस्क्रीन म्हणून तुम्ही रताळे व लिंबू यांनसारख्या नॅचरल सनस्क्रीन असणाऱ्या पदार्थांचा वापर करू शकता. 7 / 7काकडी, तुमच्या त्वचेला हायड्रेट करते ज्यामुळे त्वचेला चमकदार बनवते. त्वचेशिवाय, काकडी फाटलेल्या ओठांवर देखील चांगले काम करते आणि त्यांना मऊ बनवते. सुकलेल्या त्वचा व ओठांना ओलावा मिळवून देऊन त्यांना हायड्रेटेड करू शकता. यासाठी कोणत्याही प्रकारचे क्रीम, लोशन किंवा पेट्रोलियम जेलचा वापर न करता काकडीचा रस त्वचेला हायड्रेट करतो.