1 / 9गार्डनिंगची हौस अनेकांना असते. पण प्रत्येकाकडेच त्यासाठीची मुबलक जागा उपलब्ध असतेच असं नाही.2 / 9म्हणूनच ज्यांच्याकडे खूप जागा नाही, पण तरीही कमी जागेत जास्तीत जास्त झाडं लावायची आहेत, अशा गार्डनिंग प्रेमींनी ही काही रोपं आवर्जून लावावीत. कारण ही रोपं अगदी लहान कुंडीतही भरपूर फुलून येतात. शिवाय कायम टवटवीत राहतात. त्यामुळे घराचे सौंदर्य वाढविण्यासाठी ती निश्चितच उपयोगी ठरतात.3 / 9यापैकी पहिलं आहे मनी प्लांट. मनी प्लांटचा कोणताही प्रकार घेतला तरी तो कमी जागेतही छान फुलून येतो.4 / 9दुसरं आहे स्पायडर प्लांट. स्पायडर प्लांटलाही तुम्ही खूप छोट्या कुंडीत लावू शकता. हल्ली बाजारात चिनी मातीच्या लहान आकाराच्या बऱ्याच डेकोरेटीव्ह कुंड्या मिळतात. त्या कुंड्यांमध्ये हे झाड छान येतं. 5 / 9बेबी सनरोज या झाडाला थेट सुर्यप्रकाश नाही मिळाला तरी चालतो. सेमी शेडमध्ये हे रोप छान फुलून येतं.6 / 9ब्रोकन हर्ट हे रोप इनडोअर तसेच आऊट डोअर वापरासाठी छान आहे. 7 / 9जेड प्लांटही छोट्याशा कुंडीत छान बहरून येतं. त्याला छान स्वच्छ सुर्यप्रकाश येईल अशा जागी ठेवावे.8 / 9पर्पल हर्ट हे झाड सेमी शेडमध्ये तसेच उन्हात कुठेही ठेवले तरी चालते.9 / 9वंडरिंग ज्यू हे झाडदेखील अतिशय सुंदर असून ते इनडोअर- आऊटडोअर असं कुठेही ठेवू शकता.