शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

राखीपौर्णिमेसाठी स्पेशल लूक मिळेल फक्त १५ मिनिटांत, ६ टिप्स- दिसाल कमाल सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2023 5:51 PM

1 / 7
आता बऱ्याच ऑफिसेसमध्ये राखी पौर्णिमेच्या दिवशी सुटी नसते. त्यामुळे भाऊपण बिझी आणि नोकरी करणारी असेल तर बहिण पण बिझी. म्हणूनच अशा धावपळीमध्ये भावाला राखी बांधण्यासाठी झटपट तयार व्हायचं असेल आणि पुन्हा ऑफिसही गाठायचं असेल, तर हे काही स्पेशल लूक पाहून ठेवा. यामुळे एकतर तुम्ही खूप कमी वेळात तयार होऊ शकाल आणि दुसरं म्हणजे साधा मेकअप किंवा ड्रेसिंग असलं तरी नक्कीच आकर्षक- सुंदर दिसाल.
2 / 7
साडी नेसायला वेळ नसेल तर मस्तपैकी असा छानसा पंजाबी सूट घाला. त्याची ओढणी मात्र जरा हेवी असायला हवी. म्हणजे थोडा फेस्टिव्ह लूक येईल. पंजाबी ड्रेस आणि थोडेफार दागिने घातले तरी सुंदर दिसाल.
3 / 7
असा इंडो- वेस्टर्न लूकही राखीपौर्णिमेसाठी करू शकता. यामध्ये छानसा वनपीस घाला. कानात स्टायलिश कानातले आणि हातात ब्रेसलेट, एवढेच दागिने घातले तरी पुरेसं ठरतं. केस सहसा मोकळेच सोडा.
4 / 7
वनपीस घालायचा असेल तर त्यावर मोठे झुमके आणि हातभर बांगड्या, उठून दिसेल अशी टिकली असा काहीसा गेटअप करा. कारण वनपीस घातला तर त्यावर नाजूक दागिने उठून दिसत नाहीत.
5 / 7
कुर्ता आणि सलवार- लेगिन्स असं घालणार असाल आणि ड्रेस जर साधाच असेल तर अशावेळी हेअरस्टाईलवर जास्त फोकस करा. अशावेळी केस छान सेट करून मोकळे सोडा किंवा मग त्याचा स्टायलिश बन घाला. साध्या ड्रेसमध्येही उठून दिसाल.
6 / 7
सध्या आलिया भटच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामुळे शिफॉन साड्यांची चांगलीच क्रेझ आहे. अशी एखादी साडी असेल तुमच्या कलेक्शनमध्ये तर ती नेसा. शिफॉन साडी असल्याने त्यावर खूप जास्त मेकअप किंवा दागदागिने नाही घातले तरी चालतील.
7 / 7
ट्रॅडिशनल मराठी लूक हवा असेल तर एखादी काठपदर साडी, त्यावर एखादं गळ्यातलं, कानात कुड्या किंवा झुमके, हातात मोठी बांगडी आणि कपाळावर छोटीशी टिकली असं काहीतरी करता येईल. म्हणजे खूप जास्त नटल्यासारखेही होणार नाही आणि तरीही आकर्षक लूक मिळेल.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सRaksha Bandhanरक्षाबंधनfashionफॅशनMakeup Tipsमेकअप टिप्स