1 / 8इरकल साडी म्हणजे मुळची कर्नाटकची. वीण पाहूनच तिचा प्रकार लगेच लक्षात येतो. दिसायला थोडीफार खण साडी सारखीच वाटत असली तरी तिचा बाज वेगळाच असतो...2 / 8काही ठिकाणी इक्कत साडी म्हणूनही ही साडी ओळखली जाते.3 / 8अशी एखादी तरी इरकल साडी आपल्या कलेक्शनमध्ये असायलाच हवी. कारण ही साडी नेसायला, कॅरी करायला खूप सोपी असते आणि शिवाय ती खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांना आपण नेसू शकतो.4 / 8कॉटन प्रकारातली अशी इरकल साडी मिळते. काही साड्या प्लेन असतात तर काहींवर अशी बारिक लाईनिंग असते.5 / 8अशा पद्धतीची इरकल साडी तर ऑफिसमध्येही नेसून जाऊ शकता. तिच्यावर जर थोडं फॉर्मल ब्लाऊज शिवलं तर ती कम्प्लिट ऑफिस लूक देऊ शकते.6 / 8इरकल साडीमध्ये अशा पद्धतीची सिल्क साडीही मिळते. ही साडी चांगलीच महाग असून कमीतकमी ६ हजार रुपयांपासून ती सुरू होते.7 / 8अशा पद्धतीची बुट्टी असणारी जी सिल्क इरकल असते तिला इरकल पैठणी म्हणूनही ओळखलं जातं.8 / 8इरकल साडीच्या काही प्रकारांमध्ये असं फक्त काठांना वर्क केलं जातं आणि बाकी ठिकाणी ही साडी प्लेन असते.