शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ऐश्वर्या राय ते सोनम कपूर: डोहाळजेवणासाठी नटलेल्या बॉलिवूड अभिनेत्री; पाहा त्यांचे लूक्स- दिसावं असं देखणं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2022 16:40 IST

1 / 9
१. डोहाळेजेवण, गोदभराई किंवा बेबी शॉवर हा प्रत्येक गर्भवती स्त्रीच्या आयुष्यातला एक खास क्षण. यावेळी होणाऱ्या कोडकौतूकाचे फोटो आयुष्यभर सांभाळून ठेवले जातात. म्हणूनच तर हा खास क्षण आणखी स्पेशल करण्यासाठी तुमचा मेकअप आणि ड्रेसिंगही तेवढंच जबरदस्त हवं.. त्याचसाठीच बघा बॉलीवूड अभिनेत्रींचे, सेलिब्रिटींचे त्यांच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातल्या डोहाळेजेवणाचे फोटो.
2 / 9
२. सोनम कपूरचं डोहाळेजेवण नुकतंच थाटात पार पाडलं... लंडनमध्ये तिचं डोहाळेजेवण झालं. पारंपरिक पद्धतीने तिचं डोहाळेजेवण झालेलं नव्हतं. त्यामुळे तिने खास बेबीशॉवर थीमला सुट होणारं ड्रेसिंग केलं होतं.. गुलाबी रंगाचा गाऊन आणि हलकासा मेकअप, यात सोनम अतिशय छान दिसत होती.
3 / 9
३. ऐश्वर्या राय हिने तिच्या डोहाळेजेवणात मेहंदी रंगाची पारंपरिक काठपदर साडी नेसली होती. तिची हेअरस्टाईल आणि दागदागिनेही अगदी ट्रॅडिशनल पद्धतीचेच होते. अभिषेक बच्चनचा कुर्ताही मेहंदी कलरचा होता. डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमाला नवरा- बायको असा स्पेशल लूक ट्राय करू शकतात
4 / 9
४. सोहा अली खान हिचं बेबी शॉवर तिच्या काही खास मैत्रिणींसोबत आणि भाभी करिना कपूरसोबत झालं होतं. तिच्या डोहाळेजेवणाला तिने एकदम वेस्टर्न लूक केला होता.
5 / 9
५. मीरा राजपूतचंही तसंच. मीराने तिच्या बेबी शॉवर कार्यक्रमाला एक साधा सोबर गाऊन घातला होता. हेअरस्टाईल आणि मेकअप या दोन्ही गोष्टीही तेवढ्याच सिंपल पण तिला अतिशय क्यूट लूक देणाऱ्या होत्या. मैत्रिणींसोबत जर बेबीशॉवर प्रोग्राम असेल, तर अशा पद्धतीने मेकअप, ड्रेसिंग करायला हरकत नाही.
6 / 9
६. अभिनेत्री समीरा रेड्डी हिचं तिच्या दुसऱ्या मुलीच्या वेळीही डोहाळेजेवण झालं होतं. या कार्यक्रमासाठी तिने पिवळ्या- गुलाबी रंगाचं कॉम्बिनेशन असणारी खास कांजीवरम साडी नेसली होती.
7 / 9
७. टीव्ही अभिनेत्री भारती सिंग हिने देखील डोहाळेजेवणाला पारंपरिक पद्धतीनेच साडी नेसणं पसंत केलं होतं.
8 / 9
८. हेमा मालिनीची लेक इशा देओल हिची गोदभराईदेखील अतिशय दणक्यात झाली होती. तिने पुर्णपणे पारंपरिक वेशभुषा केली होती. लाल रंगाचा लेहेंगा, गळ्यात फुलांचा हार अशा पद्धतीने तयार झालेली इशा एखाद्या नवरीप्रमाणेच दिसत होती.
9 / 9
९. टीव्ही स्टार डेबिना देखील तिच्या डोहाळेजेवणासाठी अतिशय खास पद्धतीने तयार झाली होती. साडी, लेहेंगा, गाऊन यापेक्षा तिने वनपीस घालणं पसंत केलं. मरून रंगाच्या हेवी वर्क असणाऱ्या वनपीसमध्ये डेबिना गोड दिसत होती.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सAishwarya Rai Bachchanऐश्वर्या राय बच्चनSonam Kapoorसोनम कपूरSoha Ali Khanसोहा अली खान