1 / 8ब्लाऊजचे गळे तर जवळपास प्रत्येक महिलाच थोड्या वेगळ्या पद्धतीने, वेगळं डिझाईन असणारं शिवते. शक्यतो ब्लाऊजच्या गळ्याचं डिझाईन पुन्हा रिपिट होत नाही.. त्याच पद्धतीने थोडा बदल ब्लाऊजच्या बाह्यांच्या बाबतीतही करून पाहा.2 / 8 त्यासाठीच बघा ब्लाऊजच्या बाह्यांसाठी हे काही वेगवेगळे डिझाईन्स.. साडीमधला तुमचा लूक खुलून यायला त्याची नक्कीच मदत होईल. 3 / 8अशा पद्धतीचं छोट्या छोट्या खिडक्या असणारं डिझाईनही तुम्ही घेऊ शकता.. ब्लाऊजच्या बाह्या जर व्यवस्थित फिटींगच्या असतील तर हात खूप छान दिसतात.4 / 8अशा पद्धतीचे लटकन लावूनही तुम्ही ब्लाऊजच्या बाह्या अधिक आकर्षक करू शकता.5 / 8बाह्यांवर मोत्यांच्या छोट्या माळा लावलेलं असं एखादं डिझाईनही खूप छान दिसतं.. 6 / 8शिफॉन साडी असेल तर तिच्यावरच्या ब्लाऊजच्या बाह्या अशा घेरदार आणि लांबलचक करू शकता. अशा पद्धतीच्या ब्लाऊजमुळे साडी साधी असेल तरी तिला खूप छान लूक येतो.7 / 8सध्या नेटच्या झालर असणाऱ्या बाह्यांची खूप फॅशन आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं एखादं ब्लाऊज तुमच्या कलेक्शनमध्ये असायलाच हवं.8 / 8 स्लिव्हलेस बाह्यांना या पद्धतीने लेस लावून अधिक सुंदर बनवू शकता. एखादी प्लेन साडी असेल किंवा नाजूक स्टोन वर्क, मोती वर्क असणारी साडी असेल तर तिच्यावर अशा पद्धतीचं ब्लाऊज शिवा.