मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
1 / 7काही जणांच्या डोक्यात नेहमीच खूप कोंडा असतो. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असा कोणताही ऋतू असला तरी डोक्यातला कोंडा काही केल्या कमी होतच नाही.2 / 7डोक्यात खूप जास्त कोंडा असेल तर अगदी चारचौघांत केसांमधून हात फिरविण्याची किंवा भांग बदलून एखादी वेगळी हेअरस्टाईल करण्याचीही सोय नसते. कारण लगेच कोंडा सगळ्यांना दिसतो आणि खूप लाजिरवाणं वाटतं.3 / 7केसांत कोंडा असेल तर डोक्यातून कायम दुर्गंधी येते. शिवाय केस देखील गळतात. म्हणूनच डोक्यातला कोंडा कमी करण्यासाठी ब्यूटी एक्सपर्ट जावेद हबीब यांनी सांगितलेला हा एक खास उपाय करून पाहा. हा उपाय कसा करायचा याविषयीचा व्हिडिओ त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 4 / 7डोक्यातला कोंडा कमी करण्यसाठी सॅव्हलॉन उपयोगी पडेल, असं ते सांगतात. ते तुम्हाला कोणत्याही औषधी दुकानात अगदी सहज मिळेल. एका वाटीमध्ये १ चमचा सॅव्हलॉन घ्या. त्यामध्ये ५ चमचे पाणी घ्या.5 / 7हे मिश्रण कापसाच्या बोळ्याच्या मदतीने केसांच्या मुळाशी लावा.6 / 7त्यानंतर १५ मिनिटांनी नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका.7 / 7हा उपाय आठवड्यातून एकदा करा. दोन आठवड्यातच केसांमधला कोंडा बऱ्यापैकी कमी झाल्याचे जाणवेल, असं जावेद हबीब सांगतात.