शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pearl Ring Designs: रोजच्या वापरासाठी सुंदर नाजुक मोत्याची अंगठी, हाताचं सौंदर्य खुलविणाऱ्या १० डिझाईन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2024 15:21 IST

1 / 10
मोत्याचं सौंदर्य काही वेगळंच असतं. त्यामुळेच तर लग्नकार्यात आवर्जून मोत्याचे वेगवेगळे दागिने घेतले जातात. काही जण आवर्जून मोत्याची अंगठी घालतात (Pearl Ring Designs). तुम्हालाही लग्नसराईनिमित्त मोत्याची अंगठी घ्यायची असेल तर हे काही लेटेस्ट पॅटर्नचे सुंदर डिझाईन्स पाहा..(latest fashion pearl ring with unique designs)
2 / 10
आजुबाजुला स्टोन जडवलेलं मोत्याच्या अंगठीचं हे एक देखणं डिझाईन पाहा. कोणालाही अगदी लगेच आवडेल असंच आहे.
3 / 10
चांदीच्या मोत्याच्या अंगठ्यांचे कित्येक प्रकार बाजारात मिळतात. पांढऱ्या मोत्याप्रमाणेच काळ्या मोत्याच्या दागिन्यांनाही खूप मागणी असते..
4 / 10
असा एखादा टपोरा मोती अंगठीच्या रुपात आपल्या हातात असेल तर हाताचं, बोटाचं सौंदर्य खुलविण्यासाठी इतर कशाचीही गरज नाही...
5 / 10
ऑक्सिडाईज प्रकारातली ही एक मोत्याची सुंदर अंगठी पाहा. ही तुम्ही रोज वापरली तरी हरकत नाही.
6 / 10
लग्नकार्यात घालण्यासाठी थोडी हेवी डिझाईन असणारी अंगठी पाहात असाल तर हे एक डिझाईन छान आहे.
7 / 10
या अंगठीसारखेच कानातले आणि गळ्यातलं पेंडंट घेतलं तर तुमचा मोत्याचा खूप छान सेट तयार होऊ शकतो.
8 / 10
मोत्याच्या अंगठीचा हा आणखी एक सुबक सुंदर प्रकार.. स्टोन लावून त्या मोत्याला अधिक उठावदार करण्यात आले आहे.
9 / 10
हे एक एकदम वेगळं डिझाईन पाहा. इतरांपेक्षा आपल्याकडे काहीतरी वेगळं, एकदम हटके असावं, असं वाटत असेल तर हे डिझाईन तुम्हाला नक्कीच आवडू शकतं.
10 / 10
रोजच्या वापरासाठी मोत्याची अंगठी घेणार असाल तर हा एक सुंदर प्रकार पाहा..
टॅग्स :fashionफॅशनjewelleryदागिनेSilverचांदीShoppingखरेदी