1 / 8बांधणीच्या साडीची क्रेझ अजूनही टिकून आहेच. जर तुम्हालाही तुमच्या बांधणीच्या साडीवर नव्या पद्धतीचं ब्लाऊज शिवायचं असेल तर हे काही लेटेस्ट ब्लाऊज पॅटर्न पाहा..2 / 8अशा पद्धतीने बाह्यांना नेटचा कपडा असणारं बांधणीचं ब्लाऊज सध्या खूप ट्रेण्डिंग आहे.3 / 8बांधणीचं स्लिव्हलेस ब्लाऊज असेल तर ते तुम्ही बांधणीच्या साडीवर तर घालूच शकता, पण त्याशिवाय इतर कोणत्याही कॉन्ट्रास्ट रंगाच्या प्लेन शिफॉन साडीवरही ते खूप मस्त दिसतं.4 / 8या पद्धतीच्या बाह्यांना बेल स्लिव्ह्ज ब्लाऊज म्हणतात. जर तुमची फिगर व्यवस्थित मेंटेन असेल तर अशा पद्धतीचं ब्लाऊज घालायला हरकत नाही.5 / 8बांधणीचं ब्लाऊज शिवण्याची ही एक नवी फॅशन. हल्ली कोपऱ्यापर्यंत लांब बाह्या अनेकजणींना आवडतात. त्या बाह्यांना खालच्या बाजुला अशी छान छोटीशी झालर लावून टाका. साडीचा लूक एकदम बदलून जाईल.6 / 8हल्ली अशा पद्धतीने स्टोन, मोती, कुंदन, सेक्विन लावून हेवी वर्क केलेल्या बांधणी ब्लाऊजचीही खूप फॅशन आहे.7 / 8बांधणीच्या साडीवर असं एखादं ब्लाऊजही शिवू शकता. एकदम स्टायलिश लूक मिळेल.8 / 8कॉलर ब्लाऊजची फॅशन सध्या आहेच. बांधणी प्रकारातही असं एखादं ब्लाऊज तुम्ही शिवू शकता.