शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

४२ व्या वर्षीही दिसते कतरिना कैफ विशीतल्या तरुणीसारखी, रोज सकाळी पिते खास ड्रिंक- परफेक्ट फिगरचे सिक्रेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2025 18:21 IST

1 / 8
वयाच्या ४२ व्या वर्षी कतरिना कैफ आई होणार आहे. याविषयीची माहिती तिने आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. तिचे आजही लाखो फॉलोवर्स आहेत. वय वाढलं तरी अजूनही ती तितकीच सुंदर कशी असा प्रश्न अनेकांना पडला आहे. (Katrina Kaif perfect figure secret)
2 / 8
कतरिनाच्या सौंदर्याचं रहस्य हे फक्त महागडे केमिकल्स उत्पादन नाही तर ती रोज सकाळी खास ड्रिंक पिते. तिच्या दिवसाची सुरुवात ती एका पेयाने करते.ज्यामुळे वाढत्या वयातही ती तितकीच सुंदर दिसते. (healthy morning drink for glowing skin)
3 / 8
ती असं म्हणते की सौंदर्य फक्त बाहेरुन येत नाही तर शरीराला आतून निरोगी ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. म्हणून ती रोज सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी पेय पिते. ज्यामुळे दिवसभर ती हायड्रेट राहाते.
4 / 8
एका मुलाखतीत तिने सांगितलं होतं की, मी सकाळी गरम पाणी पिते. त्यात कधी आले किंवा लिंबू मिक्स करुन पिते. यामुळे दिवसभर मला ऊर्जा मिळते आणि हायड्रेट राहाण्यास मदत होते.
5 / 8
या पेयामुळे तिच्या त्वचेला खोलवर हायड्रेट करते. ज्यामुळे वाढत्या वयात त्वचेवर सुरकुत्या दिसत नाही आणि ते त्वचेला चमकदार ठेवतात.
6 / 8
यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. तसेच शरीर पूर्णपणे स्वच्छ झाल्यामुळे चेहऱ्यावर तेज दिसून येते.
7 / 8
सकाळी लवकर हे पेय प्यायल्याने तिच्या दिवसाची सुरुवात ऊर्जावान होण्यास मदत होते. म्हणून ती नेहमीच उत्साही दिसते. इतकंच नाही तर ती नियमितपणे व्यायाम देखील करते.
8 / 8
जर आपल्याही चेहऱ्यावर ग्लो हवा असेल, तर आपल्या दिवसाची सुरुवात हेल्दी ड्रिंकने सुरुवात करु शकता.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजी