शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

दीपिका ते नयनतारा, सीतेची भूमिका साकारणाऱ्या पाहा ८ अभिनेत्री, स्मृती इराणी यांचीही भुमिका गाजली..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2024 17:11 IST

1 / 9
आपण रामायण (Ramayan) ही मालिका पाहिलीच असेल (Mata Seeta). या मालिकेत माता सीतेची भूमिका साकारणारी दीपिका चिखलिया सर्वांनाच ठाऊक आहे. या व्यतिरिक्त असे अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी माता सीतेच्या पात्राला पुरेपूर न्याय दिला आहे(8 actresses played sita on screen).
2 / 9
रामानंद सागर दिग्दर्शित ‘रामायण’ ही मालिका भारतातील प्रत्येक घरात पोहोचली. या मालिकेत माता सीतेची भूमिका अभिनेत्री दीपिका चिखलियाने साकारली होती. सीताची भूमिका साकारणाऱ्या दीपिकाला इतकी पसंती मिळाली की, चाहते चक्क तिची पूजा करू लागले होते. मुख्य म्हणजे या मालिकेत दीपिका आभुषणांशिवायही सुंदर दिसत होती.
3 / 9
तेलुगू भाषिक 'बाल रामायणम' या चित्रपटात स्मिता माधवने माता सीतेची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला होता. या चित्रपटात ज्युनियर एनटीआरने भगवान श्री रामाची भूमिका साकारली होती. स्मिता माधवने जेव्हा या चित्रपटात माता सीतेची भूमिका साकारली तेव्हा, ती १० वर्षांची होती. स्मिता फक्त अभिनेत्री नसून शास्त्रीय नृत्यांगना आणि गायिका देखील आहे.
4 / 9
१९९७ साली प्रदर्शित झालेला 'जय हनुमान' ही मालिका २००० पर्यंत चालली. ही मालिका पूर्णपणे भगवान श्री रामाचे परम भक्त हनुमान यांच्यावर आधारित होती. या मालिकेत अभिनेत्री शिल्पा मुखर्जीने माता सीतेची भूमिका साकारली होती. परंतु, आता तिने अभिनय क्षेत्राला रामराम ठोकला असून, ती सध्या एक व्यावसायिक फोटोग्राफर म्हणून कार्यरत आहे.
5 / 9
रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेला घवघवीत यश मिळाल्यानंतर, बीआर चोप्रा आणि रवी चोप्रा यांनी मिळून 'रामायण' मालिका तयार केली. या मालिकेमध्ये नितीश भारद्वाज यांनी प्रभू श्रीरामांचे पात्र साकारले, तर अभिनात्री आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी माता सीतेची भूमिका साकारली होती. त्यांनी साकारलेलं हे पात्र प्रेक्षकांना खूप भावलं.
6 / 9
२००६ साली लंकापती रावणाला केंद्रस्थानी ठेवून रावण या मालिकेची निर्मिती करण्यात आली. या मालिकेत नरेंद्र झा यांनी रावणाची भूमिका साकारली होती. तर, अभिनेता दिवाकर पुंडीर यांनी श्री रामांची भूमिका साकारली. यासह अभिनेत्री नम्रता थापा यांनी माता सीतेची भूमिका साकारून, या मालिकेमध्ये आपली वेगळी छाप पाडली.
7 / 9
रामानंद सागर यांचा मुलगा आनंद सागर याने देखील २००८ साली रामायण मालिकेची निर्मिती केली. अभिनेता गुरमीत चौधरीने श्रीरामांची भूमिका साकारली तर, अभिनेत्री देबिना बॅनर्जी यांनी माता सीतेची भूमिका साकारली होती. या मालिकेत काम करत असतानाच दोघेही एकमेकांच्या प्रेमात इतके बुडाले की त्यांनी २०११ साली लग्न केले.
8 / 9
तेलुगू भाषिक 'श्री राम राज्यम' या चित्रपटात लेडी सुपरस्टार नयनताराने माता सीतेची भूमिका साकारली होती. या चित्रपटात नयनतारा खूप सुंदर दिसत होती. दीपिका चिखलिया ही हिंदीतील सर्वोत्कृष्ट सीता मानली गेली, तर साऊथ सिनेसृष्टीत नयनताराने साकारलेल्या माता सीतेची भूमिका प्रेक्षकांना भावली.
9 / 9
आदी पुरुष हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला जरी असला तरी, अभिनेत्री कृती सेनन हिने साकारलेलं पात्र, प्रेक्षकांना प्रचंड आवडलं. तिने या चित्रपटात माता सीतेची भूमिका साकारली होती. शिवाय आभुषणांशिवाय कृती खूप सुंदर-सालस दिसत होती.
टॅग्स :Ayodhyaअयोध्याSocial Viralसोशल व्हायरलCelebrityसेलिब्रिटी