1 / 8आपणही केसांना नैसर्गिकरित्या रंगविण्यासाठी मेहंदी वापरतो का? तर आपल्याला वेळीच थांबायला हवे. मेहंदी लावल्याने आपल्या केसांवर दुष्परिणाम होतो. (Is applying Mehendi on the scalp safe)2 / 8यामुळे आपले केस कोरडे आणि निर्जीव होतात. यात असणारे टॅनिन केसांमधील नैसर्गिक तेल काढून टाकते. ज्यामुळे केस कोरडे होतात. तसेच केसांना फाटे फुटण्याची आणि तुटण्याची शक्यता अधिक असते. (Side effects of using Mehendi on hair)3 / 8केसांवर मेहंदी लावल्याने केसांचा पोत खराब होतो. त्यामुळे केसांवर जाड थर तयार होतो. केसांची गुणवत्ता कमी होते. 4 / 8सतत मेहंदी वापरल्याने टाळूची छिद्रे बंद होतात. ज्यामुळे टाळूची त्वचा योग्यरित्या श्वास घेऊ शकत नाही. व्यवस्थितरित्या टाळूला पोषण मिळत नाही. ज्यामुळे केस पातळ होतात. 5 / 8मेहंदी लावल्यानंतर अनेकांना टाळूवर खाज येते, जळजळ होते आणि डोक्यात फोड्या येतात. त्वचा संवेदनशील असल्यामुळे या समस्येला सामोरे जावे लागते. 6 / 8बऱ्याचदा केसांना रंग देण्यासाठी मेहंदी वापरतो. यात असणारे केमिकल केसांन हानी पोहचवतात. ज्यामुळे केस पांढरे होण्याची शक्यता अधिक असते. 7 / 8नैसर्गिक मेहंदीचा थर आपल्या केसांवर अडथळा तयार करतो. या रासायनिक रंगामुळे केसांच्या मुळांवर परिणाम होतो. ज्यामुळे केसगळती होण्यास सुरुवात होते.8 / 8रंग दीर्घकाळ टिकावा यासाठी मेहंदी पावडरमध्ये रासायनिक आणि कृत्रिम रंग वापरतात. हे वापरल्याने आपल्याला स्कॅल्पची अॅलर्जी देखील होऊ शकते.