शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5

    प्रत्येक महिलेच्या कपाटात हवेत ७ ड्रेस, सतत शॉपिंग न करताही तुम्ही दिसाल स्टायलिश-स्मार्ट-तरुण

    By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2026 18:46 IST

    1 / 8
    लग्न समारंभ असो किंवा साधं हळदी कुंकू. प्रत्येक वेळी साडी नेसणं सगळ्यांनाच शक्य होत नाही. तसेच ऑफीसला काही खास ड्रेस घालून जायचा असेल तर काय करावं काय नको असा प्रश्न पडतो. अशावेळी प्रत्येकीच्या कपाटात जर हे ७ प्रकार असतील तर काही टेंशनच नाही.
    2 / 8
    सध्या ट्रेंडींगवर आहे असा एक मस्त प्रकार म्हणजे अंगरखा सुट. पुर्वीच्या काळी वापरला जाणारा हा प्रकार आता पुन्हा लोकप्रिय ठरत आहे. त्याचा फ्रंट लूक जरा इतर ड्रेसपेक्षा वेगळा येतो. त्यामुळे नक्की वापरुन पाहा.
    3 / 8
    मध्यंतरी फॅड आलं होतं ते शरारा सुटचं. दिसायला जरा वेगळा असल्याने तो मुलींमध्ये फेमस झाला, काही चित्रपटातील गाण्यांमुळे त्याला जास्त प्रसिद्धी मिळाली. दिसतो सुंदर आणि त्यात अनेक प्रकारही असतात.
    4 / 8
    सगळ्यात कॉमन म्हणजे अनारकली. कितीतरी नवीन पॅटर्न आले मात्र अनारकलीबद्दलचं प्रेम काही कमी झालं नाही. वापरायला सोपा आणि दिसायला अगदी सुंदर. तसेच जास्त महागही नसतो. त्यामुळे एखादा अनारकली घरात असावाच.
    5 / 8
    साधा सुंदर आणि सोज्वळ लूकसाठी ए - लाइन सुट वापरुन पाहा. कॉटर्नमध्ये ही मिळतो फारच कम्फर्टेबल असा हा प्रकार आहे. रोजच्या वापरासाठी मस्त तसेच कार्यक्रमातही वापरु शकता.
    6 / 8
    कफ्तान गेल्या काही वर्षात फारच खास ठरला. नाईट ड्रेस ते लग्नात घालण्यासारख्या ड्रेसमध्येही हा प्रकार मिळू लागता. छान हवेशीर आहे. तसेच त्यात विविध प्रकारही आहेत.
    7 / 8
    पटियाला सुट अनेक वर्षे महिला वापरत आल्या आहेत. पंजाबी स्टाइल असा हा ड्रेस सुंदर दिसतो. तसेच फार कॉमन असा पॅटर्न आहे. आजकाल फार पाहायला मिळत नाही मात्र काही वर्षांपूर्वी सगळेच वापरताना दिसायचे.
    8 / 8
    पलाझो सेट गेल्या काही वर्षात फार लोकप्रिय ठरला, रोजच्या वापरासाठी फार मस्त असा हा प्रकार. नक्कीच वापरुन पाहा. लग्नात घालण्यासाठीही मस्त मिळतात तसेच रोजच्या वापराचेही असतात. सुंदर प्रकार आहे.
    टॅग्स :fashionफॅशनSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलWomenमहिलाShoppingखरेदी