1 / 7केस गळणं, केसांची अजिबात वाढ न होणं अशा तक्रारी आता खूपच वाढल्या आहेत.2 / 7थंडीचे दिवस असल्याने डोक्यातला कोंडा वाढून केस गळण्याचं प्रमाणही प्रचंड वाढलेलं आहे.3 / 7अशातच कमी वयातच केस पांढरे होत असल्याने तरुणाई वैतागून गेली आहे. केसांच्या अशा सगळ्या तक्रारी दूर करायच्या असतील तर घरच्याघरी काही आयुर्वेदिक तेलांचा वापर करून पाहा..4 / 7त्यातलं पहिलं आहे भृंगराज तेल. या तेलाने आठवड्यातून एकदा केसांना मालिश करा आणि तासाभराने केस धुवून टाका. केसांची मुळं पक्की होऊन केस गळण्याचं प्रमाण कमी होईल. 5 / 7आवळ्याचे बारीक तुकडे करा आणि ते खोबरेल तेलामध्ये किंवा तिळाच्या तेलामध्ये घालून उकळवून घ्या. हे तेल गाळून घ्या. हे आवळ्याचं तेल केसांना नियमितपणे लावल्यास केस पांढरे होण्याचं प्रमाण कमी होतं.6 / 7केसांची मुळं पक्की करून केसांची चांगली वाढ होण्यासाठी गरजेचे असणारे प्रोटीन्स तिळाच्या तेलामध्ये चांगल्या प्रमाणात असतात. शिवाय हे तेल उष्णही असतं. त्यामुळे हिवाळ्यात तिळाच्या तेलाने स्काल्पला मालिश करा. काही दिवस नियमितपणे हा उपाय केल्यास केसांमध्ये चांगला बदल दिसून येईल.7 / 7रोजमेरी ऑईलही केसांसाठी अतिशय चांगलं आहे. खोबरेल तेलामध्ये किंवा तुम्ही केसांसाठी जे तेल वापरता त्यामध्ये रोजमेरी तेलाचे ४ ते ५ थेंब घाला आणि त्याने डोक्याला मालिश करा. केस भराभर वाढतील.