शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गर्लफ्रेंडला चुकूनही 'या' गोष्टी सांगाल तर ब्रेकअप झालंच म्हणून समजा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2020 5:31 PM

1 / 7
आपण आपल्या रिलेशनशीपमध्ये कितीही प्रमाणिक असलो तरी अनेकदा पार्टनरपासून काही गोष्टी लपवून ठेवायच्या असतात. जर तुम्ही असं केलं नाही तर भांडण होण्याची शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्याचा वापर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असताना कराल तर भांडणं होण्यापासून रोखता येऊ शकतं.
2 / 7
एखाद्या मुलीला जर तुम्ही डेट करत असाल तर लगेच तिला प्रपोज करू नका. आधी तिला समजून घ्या. जर ती सुद्धा तुमच्याबाबत सकारात्मक असेल तर ती तुमच्या सोबत राहील.
3 / 7
यापूर्वी तुमचे अफेअर होते तर ते तुमच्या गर्लफ्रेंडला लगेच सांगू नका. मुली या गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सूक असतात. पण जर त्यांना ही गोष्ट तुम्ही सांगितली तर त्यांना असुरक्षित वाटते.
4 / 7
तुमच्या आवडीनिवडी पार्टनरला सांगून लादण्याचा प्रयत्न करू नका. त्यांच्या आवडीनिवडींचा सुद्धा आदर करा.
5 / 7
तसचं मुलींच्या कुंटूबाबद्दल सुद्धा काही बोलू नका. सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा.
6 / 7
तुम्हाला जर काही वाईट सवयी असतील तर पहिल्याच दिवशी सांगू नका. काहीवेळा नंतर तुम्ही तुमच्या सवयींबद्दल सांगू शकता.
7 / 7
गर्लफ्रेंडच्या मित्रांविषयी वाईट बोलू नका, हे त्यांना आवडत नाही. तसेच तिच्या मैत्रिणींचे कौतुकही करू नका. कारण तिला वाटेल की तुम्हाला त्यांच्यात जास्त इंन्टरेस्ट आहे.
टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिप