1 / 12आता ही युती तुटते की टिकते याकडेच संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.2 / 12गेल्या २५ वर्षांपासून अभंग असलेल्या महायुतीला आता तडे जाऊ लागले आहेत.3 / 12मात्र तरीही सेनेच्या भूमिकेत काहीही बदल झालेला नसून सध्या युतीमध्ये तणाव सुरू आहे.4 / 12सेनेने जराही झुकते न घेता आपल्या मागणीचा जराही विचार न केल्यामुळे नाराज भाजपा नेत्यांनी युती तोडत स्वबळावर लढण्याचा मनोदय बोलून दाखवला.5 / 12शिवसेनेने मात्र या मागणीकडे साफ दुर्लक्ष करत भाजपाला ११९ जागा देण्याचा निर्णय घेतला.6 / 12राज्यात असलेली शिवसेनेची मोठ्या भावाची आणि भाजपाची लहान भावाची भूमिका भाजपाला मंजूर नव्हती आणि त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी निम्या म्हणजेच १४४ जागांची मागणी केली.7 / 12मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे कमकुवत झालेली सेना आणि लोकसभा निवडणुकीत एकट्या लोकसभा निवडणुकीत एकट्या नरेंद्र मोदींमुळे मिळालेल्या यशानंतर महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला बदलण्याची गरज भाजपाला वाटू लागली.8 / 12या यशामुळे येत्या विधानसभा निवडणूकीतही महायुतीला जोरदार यश मिळेल आणि पुन्हा त्यांचे सरकार सत्तेवर येईल असेच सर्वांना वाटत होते.9 / 12अवघ्या चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं तसंच राज्यातही महायुतीला कौल मिळाला. महायुतीने राज्यात ४२ जागा जिंकल्या.10 / 12युतीने १९९५ साली राज्याची सत्ता हस्तगत करत आपली ताकद दाखवली. - त्यानंतर युतीचा सिलसिला असाच कायम राहिला. केद्रांत भाजप तर राज्यात शिवसेना असा युतीचा अलिखित नियम दोन्ही पक्ष पाळत होते.11 / 12बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजना यांच्या पुढाकाराने २५ वर्षांपूर्वी महायुती आकारास आली. १९९०साली शिवसेना व भाजपाने प्रथमच विधानसभा निवडणुक एकत्र लढवली.12 / 12विधानसभा निवडणुकीतील जागावाटपावरून शिवसेना- भाजप यांच्यामध्ये सध्या चांगलीच धुसफूस सुरू आहे. २५ वर्षांपूर्वी झालेली ही महायुती आत तुटण्याच्या उंबरठ्यावर आहे. ही युती नेमकी कधी कशी झाली त्याचा मागोवा घेऊया या छायाचित्रांमधून