Bipin Rawat: 'त्या' अखेरच्या ७ मिनिटांत काय घडलं? बिपिन रावत यांच्या मृत्यूनंतर हेलिकॉप्टर दुर्घटनेतून निघतायेत संशयाचे धूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 12:12 IST
1 / 10तामिळनाडूच्या कुन्नूर येथे भारतीय वायूदलाचं हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानंतर आता अनेकांना मागील वर्षी झालेल्या एका अपघाताची आठवण येत आहे. जानेवारी २०२० मध्ये तैवानचे चीफ ऑफ जनरल स्टाफ यांचा मृत्यूही एका हेलिकॉप्टर दुर्घटनेत झाला होता.2 / 10यावेळी भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांच्यासह १३ जणांचा मृत्यू हेलिकॉप्टर दुर्घटनेत झाला. आता तिन्ही संरक्षण दलाचे अधिकारी संयुक्तरित्या या अपघाताची कारणं शोधत आहे. नेमकं काय घडलं? इतकं सुरक्षित हेलिकॉप्टर कोसळलं कसं याचा तपास घेतला जात आहे.3 / 10MI-17 हेलिकॉप्टर उड्डाण घेतल्यानंतर १२ वाजून १५ मिनिटांनी लँड करणार होते. परंतु लँडिंगच्या ७ मिनिटांपूर्वी त्याचा ATC सोबत संपर्क तुटला. या ७ मिनिटांत नेमकं काय घडलं? हाच प्रश्न अनेकांच्या मनात पडला आहे. बिपिन रावत यांच्या मृत्यूनं संपूर्ण देश हादरला आहे.4 / 10हेलिकॉप्टर क्रॅश होण्यापूर्वीचा १९ सेकंदाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्याचं विश्लेषण केले जात आहे. व्हिडीओत हेलिकॉप्टर धुक्यात जात असल्याचं दिसून येते. त्यानंतर अचानक खाली आगीच्या गोळ्यासारखं कोसळतं. त्यामुळे हवामान खराब झाल्यानं ही घटना घडली का? अशी शंका अनेकांना आहे.5 / 10निवृत्त स्क्वॉड्रन लीड दिप्ती काला यांनी सांगितले की, फॉगची डेंसिटी आणि विजिबिलिटी याची माहिती पायलटला दिली जाते. जर विजिबिलिटी डाऊन असेल तर फ्लाइंग होणार नाही. जेव्हा हवामान मध्येच खराब होतं तेव्हा पायलटला काय करायचं याची कल्पना असते. तो जवळच लँडिंग करुन हवामान बदलण्याची वाट पाहतो. 6 / 10दुसरा प्रश्न इंजिन फेल झाल्यानं दुर्घटना घडली? तर त्याबाबत निवृत्त कॅप्टन अमिताभ रंजन म्हणतात की, MI 17 हेलिकॉप्टरचं वैशिष्टं म्हणजे याच्या एका इंजिनमध्ये इतकी ताकद आहे की तो कुठूनही येऊन लँड करु शकतो. २ इंजिन असलेले हे हेलिकॉप्टर आहे. दोन्ही एकत्र काम करतात. आपत्कालीन परिस्थितीत एक ऑफ झाला तरी दुसरा काम करत असतो.7 / 10हेलिकॉप्टर उड्डाणापूर्वी सँपलिंग केले जाते. जर कुठल्या कारणास्तव इंधनात काही आलं ज्यामुळे एक इंजिन बंद पडलं तरी दुसरं इंजिन बंद पडू शकत नाही. दोन्ही इंजिन एकाचवेळी बंद होऊ शकत नाही. त्यामुळे इंजिन खराब झाल्यानं क्रॅश झालं असेल याचा कॅप्टन अमिताभ रंजन यांनी नकार दिला.8 / 10मग नेमकं अखेरच्या ७ मिनिटांत काय घडलं? ज्याचा तपास वायूदलाकडून मार्शल मानवेंद्र सिंह यांच्या नेतृत्वात बनलेल्या टीमकडून केला जात आहे. हेलिकॉप्टर क्रॅशनिगडीत सर्व माहिती आणि खुलासे समोर येण्यासाठी आता अपेक्षा ब्लॅक बॉक्सवर आहे. कारण ७० टक्के प्रत्येक अपघाताचं कारण ब्लॅक बॉक्समधून समोर येते.9 / 10हवेत उडणारं हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं. या हेलिकॉप्टरच्या इंधनाची क्षमता २६०० लीटर आहे. ८०० लीटर प्रतितास त्याचा वापर होतो. हेलिकॉप्टर टेक ऑफ आणि क्रॅश यामध्ये १५ मिनिटांचे अंतर आहे. त्यामुळे इंधन खूप कमी संपलं आहे. त्यामुळे २ हजार लीटर इंधन असेल जे पेट घेण्यासाठी खूप आहे. आग भीषण असू शकते.10 / 10मला वाटतं नक्कीच काहीतरी इमरजेन्सी झाली असेल ज्यामुळे पायलटला डोंगराळ प्रदेशात धुक्यात घुसावं लागले. अपघाताच्या कारणांचा शोध जळून राख झालेल्या हेलिकॉप्टरच्या मागील बाजूस असलेल्या डेटा रेकॉर्डच्या तपासातून समोर येऊ शकतं असं कॅप्टन अमिताभ रंजन यांनी सांगितले.